Breaking
ब्रेकिंग

करमाळा येथे सर्वोदय प्रतिष्ठान तर्फे गणेशोत्सवाचे औचित्य साधत बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन

0 8 6 5 5 8

करमाळा येथे सर्वोदय प्रतिष्ठान तर्फे गणेशोत्सवाचे औचित्य साधत बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १७/ करमाळा येथील सर्वोदय प्रतिष्ठानने दरवर्षीप्रमाणे याही वर्षीही गणेशोत्सवाचे औचित्य साधत बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध व नामवंत व्याख्यात्यांची व्याख्याने आयोजित केली जातात. यावर्षी दि. 19 सप्टेंबर 2026 ते 21 सप्टेंबर 2026 असे सलग तीन दिवस ही व्याख्यानमाला करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहामध्ये दररोज सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे.

या व्याख्यानमालेमध्ये शनिवार दि. 19 सप्टेंबर 2026 रोजी मुंबई येथील कवी, लेखक व चित्रपट कथालेखक चला हवा येऊ द्या फ्रेम प्रसिद्ध साहित्यिक अरविंद जगताप यांचे “गोष्ट छोटी डोंगराएवढी” या विषयावर, तर रविवार दि. 20 सप्टेंबर 2026 रोजी पुणे येथे प्रसिद्ध लेखक देवा झिंजाड यांचे “एक भाकर तीन चुली” या विषयावर आणि सोमवार दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी माजलगाव येथील प्रसिद्ध साहित्यिक व कवी प्रभाकर साळेगावकर यांचे “क्रिएटिव्हिटी टू पॉझिटिव्हिटी” या विषयांवर व्याख्याने होणार आहेत.

तरी करमाळ्यातील सर्व विद्यार्थी, पालक व रसिकांनी या व्याख्यानांचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्वोदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक चव्हाण व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे