Breaking
ब्रेकिंग

दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्थेकडून गोसावीदरा मधील आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप

0 3 9 0 2 1

दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्थेकडून गोसावीदरा मधील आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप

एस डब्ल्यु न्यूज / प्रतिनिधी

दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्था यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा उपक्रम घेण्यात आला. त्यावेळी दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहादेव मुंगसे साहेब यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोसावीदरा ( देवठाण ) ता. अकोले येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊवाटप केले. श्री . शहादेव मुंगसे यांनी दक्ष पोलीस मित्र संस्थेचे कार्य व काम विद्यार्थ्यांना सांगितले. ते विद्यार्थ्यांशी बोलताना म्हणाले की, दक्ष पोलीस मित्र ट्राफिक पोलिसांना मदत करते, देवस्थान यात्रा उत्सव, सभा, सप्ताह इत्यादी ठिकाणी दक्ष पोलीस मित्र काम करते. ते काम करता करता अनोखे उपक्रमही आम्ही करत असतो. वृक्षरोपण करणे, शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करणे अशा प्रकारे आमच्या संस्थेचे कार्य चालते.

यावेळी श्री संभाजी वैद्य सर, रवींद्र भणगे , कमलेश काळे ,समाधान गिऱ्हे , रामदास गिऱ्हे, सखाराम पथवे , परभत मेंगाळ, संजय दुधावडे, दिनकर गिऱ्हे, वाळिबा मेंगाळ, बबन मेंगाळ, मोहन पथवे, किरण शेळके, रोहिणी गिऱ्हे, उज्वल गिऱ्हे, सुखदेव गिऱ्हे, संदीप पथवे आदी उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे