Breaking
ब्रेकिंग

नारायणडोहो येथे पोषण महा सप्ताह साजरा…

0 8 6 5 0 8

नारायणडोहो येथे पोषण महा सप्ताह साजरा…

नारायणडोहो:-प्रतिनिधी रफिक शेख

नगर तालुक्यातील नारायणडोहो येथे आज दिनांक 3/10/2025 रोजी पोषण महा सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील महिला युवा सरपंच सौ. श्रद्धा साठे ह्या होत्या हे होते या वेळी कार्यक्रमाची सुरुवात मंदाबाई साठे यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली यावेळी महा पोषण सप्ताह निमित्ताने गावातील महिलानी खिचडी, लापशी, हरभरा, फळे भाज्या, गरोदर मातेला लागणारा सकस संतुलित आहार यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. महा पोषण सप्ताह हा महिणाभर राबविण्यात येतो.

यावेळी अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका कांताबाई साठे, उषा ताकटे,मनीषा साठे, उषा साठे, वंदना कांबळे, राजश्री मुंढे, परिगा जगताप, शोभा साठे, आशा साठे,जि.प्र. शाळेचे शिक्षिका प्रियांका खांदवे, विनिता शिंदे याच्या सह गावातील महिला मोठ्या संख्येने मंदाबाई साठे, अनिता गाडे, साखरबाई मिसाळ, शबनम शेख, आपसाना शेख, सुवर्णा गंगार्डे,कविता गंगार्डे, प्रीती मिसाळ, नितीन साठे,मोनिका साठे,पूजा लांडगे,कांचन कांबळे, उपसरपंच अनिल कराळे, अमोल गुंड, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संतोष ढगे सर, राजू सोनवणे, प्रवीण बेलदार, आदी उपस्थित होत्या. हा यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे