करमाळा येथील श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायत येथे 26 जानेवारी दिवशी नूतन सरपंच वेणूबाई संतोष पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
करमाळा येथील श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायत येथे 26 जानेवारी दिवशी नूतन सरपंच वेणूबाई संतोष पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २७/ करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत आई कमला भवानी मंदिर येथील श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायत चे नूतन सरपंच वेणूबाई संतोष पवार यांच्या हस्ते ग्रामपंचायतचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित श्रीदेवीचा माळ तंटामुक्त अध्यक्ष सचिन भाऊ चोरमले, उपसरपंच सचिन शिंदे, ग्रा. प. सदस्य माजी सरपंच ग्रामसेवक दत्तात्रय जाधव, सिद्धेश्वर सोरटे, जयराम तात्या सोरटे, प्रभाकर सोरटे, अमोल चव्हाण, महेश सोरटे, प्रभाकर फलफले आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणासाठी श्रीदेवीचा येथील गावातील सर्व नागरिक व ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी स्टाफ उपस्थित होता.