पारडसिंगा सर्कलच्या राजकारणात नवा युवा चेहरा – आकाश बेहनिया यांची जोरदार चर्चा*
*पारडसिंगा सर्कलच्या राजकारणात नवा युवा चेहरा – आकाश बेहनिया यांची जोरदार चर्चा*
राहुरी तालुका जावेद शेख
आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पारडसिंगा सर्कलसाठी आरक्षण जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला असून अनेक नवोदित चेहरे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये विशेष लक्ष वेधून घेत आहे तो म्हणजे आकाश बेहनिया – एक उच्चशिक्षित, ध्येयवेडा आणि सामाजिक कार्यात सक्रिय युवक, जो आता जनतेच्या सेवेसाठी थेट राजकारणाच्या मुख्य प्रवाहात उतरण्याच्या तयारीत आहे.
आकाश बेहनिया हे माजी पंचायत समिती सदस्य स्व. डोमाजी बेहनिया (पाटील) यांचे नातू असून, काटोल बाजार समितीचे माजी संचालक हिराचंद बेहनिया यांचे पुतणे आहेत. त्यांच्या वडिलांचे, मधुकर बेहनिया यांचे देखील सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. या पार्श्वभूमीमुळे आकाश यांना राजकीय आणि सामाजिक वारसा लाभला असून, तोच वारसा पुढे नेण्याचा त्यांचा निर्धार आहे.
*सामाजिक बांधिलकी आणि जनसंपर्क*
आकाश बेहनिया हे ‘विनज सोशल फाऊंडेशन’, ‘विश्वव्यापी सेवा भावी संस्था’, आणि ‘ध्येयवादी युवा संघटना’ यांचे अध्यक्ष आहेत. त्यांनी शेकडो नागरिकांना शासकीय योजना, सेवा व सुविधा मिळवून देण्याचे कार्य सातत्याने केले आहे. त्यांच्या विनज सेवा केंद्राच्या माध्यमातून अनेकांना उपलब्धता, मार्गदर्शन व मदत मिळाली आहे. त्यामुळे परिसरात त्यांचा जनसंपर्क अत्यंत दांडगा असून, ते युवकांमध्ये विशेषतः लोकप्रिय आहेत.
*सन्मान आणि युवा नेतृत्व*
भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा कोर सदस्य
महाराष्ट्र शासनाचा ‘जिल्हा युवा पुरस्कार’ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्राप्त
*सर्वपक्षीय संबंध – राजकारणात व्यापक संपर्क*
आकाश बेहनिया यांचे सर्व प्रमुख पक्षांतील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध आहेत. ते भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस, प्रहार, वंचित, आणि आम आदमी पक्ष यांच्यासोबत संवाद ठेवून काम करत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख व आमदार सलील देशमुख यांच्याशी त्यांच्या कुटुंबाचे भावनिक आणि विश्वासाचे नाते असून, हे नाते स्थानिक राजकारणात प्रभावी ठरू शकते, अशी चर्चा आहे.
*उमेदवारीसाठी वाढलेली मागणी*
पारडसिंगा सर्कल ‘सर्वसाधारण’ प्रवर्गासाठी आरक्षित असल्यामुळे अनेक दावेदार समोर आले आहेत. मात्र, स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आकाश बेहनिया यांना उमेदवारी मिळावी, अशी जोरदार मागणी करत आहेत. त्यांच्यासारख्या समर्पित, युवा आणि सक्षम नेतृत्वाला संधी मिळाल्यास परिसराचा सर्वांगीण विकास शक्य होईल, असा स्थानिकांचा ठाम विश्वास आहे.


