अखिल भारतीय ग्राहक पंचायत अकोले तालुका उपाध्यक्षपदी बाळू नवाळी यांची निवड
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अकोले तालुका उपाध्यक्षपदी बाळू नवाळी यांची निवड
संगमनेर प्रतिनिधी / नितीनिचंद्र भालेराव
ग्राहकांचे हक्क,सुरक्षा व दर्जेदार वस्तू व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या अकोले तालुका उपाध्यक्षपदी बाळू नवाळी यांची निवड करण्यात आली. जिल्हा अध्यक्ष शाहूराव औटी यांच्या अध्यक्षतेखाली अकोले येथे बैठक घेण्यात आली.सदर बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राहाणे,जिल्हा सचिव दिनेश थोरात,जिल्हा कोषाध्यक्ष अप्पासाहेब नरोटे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भगवान गायकवाड,जिल्हा ग्राहक मार्गदर्शन आयाम प्रमुख हरिभाऊ चौधरी यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
सन 1974 मध्ये पुण्यात स्थापना झालेल्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतने आजवर हजारो ग्राहकांच्या तक्रारी सोडवून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.देशभरातील शाखांद्वारे संस्था भ्रामक जाहिरातींना आळा घालणे,बाजारपेठेतील गैरप्रकार उघड करणे,ग्राहकांना कायदेशीर मदत करणे,तसेच ग्राहक साक्षरता अभियान राबविणे या विविध उपक्रमांद्वारे सातत्याने कार्यरत आहे.ग्राहक पंचायत समाजातील सर्वसामान्य लोकांपर्यंत ग्राहक हक्कांची माहिती पोहोचविण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे,व्याख्यानमाला, जनजागृती मोहीमा अशा अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते.
ग्राहक हक्कांची जाणीव निर्माण करणे,संघटना मजबूत करणे आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले जाते.
बाळू नवाळी यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात संघटनेचे कार्य अधिक जोमाने होईल तसेच त्यांच्या नियुक्तीमुळे अकोले तालुक्यात ग्राहक चळवळीला नवीन गती व दिशा मिळेल,असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.तर राजूर परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.


