ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य व नमो फाऊंडेशन च्या वतीने बाबावाडी येथे मुलांना मिठाई चे वाटप
शिक्षण घेवून मोठे अधिकारी व्हा - पीआय शिरिष बेगडे
ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य व नमो फाऊंडेशन च्या वतीने बाबावाडी येथे मुलांना मिठाई चे वाटप
शिक्षण घेवून मोठे अधिकारी व्हा – पीआय शिरिष बेगडे
प्रतिनिधी : आसावरी वायकर
अहिल्यानगर : ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आणि नमो बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि . १७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता रिटायर्ड पीआय शिरीष बेगडे साहेब यांच्या शुभ हस्ते नगर येथील आयुर्वेद कॉलेज जवळ बाबावाडी या ठिकाणी मुलांना फराळ व मिठाई चे वाटप करण्यात आले. नमो बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संजय वायकर व संस्थेच्या सचिव पुनम कानडे यावेळी उपस्थित होते . मुलांचा उत्साह व आनंद पाहण्या सारखा होता .
पीआय शिरिष बेगडे यांनी सांगितले की, बाबावाडी येथील मुलांना मिठाई वाटप करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे . मुलांनी शिक्षण घेवून मोठ्या पदावर जाऊन मोठे अधिकारी व्हावे आणि संस्थेचे नाव उज्वल करावे तसेच भविष्यात गरजु विद्यार्थ्यांनाही मदत करावी . मुलांनी अभ्यास कसा करावा व लक्षात कसा ठेवावा या विषयी मार्गदर्शन केले .
निलेश लोढा यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले की , शिक्षण हे महत्वाचे असून तुम्हाला जर भविष्यात मोठा अधिकारी व्हायचे तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही . तेव्हा तुम्ही खुप अभ्यास करा आणि यश संपादन करा . पत्रकार संघाच्या सर्वच मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले .
याप्रसंगी धीरज लांडगे, पत्रकार सचिन गांधी , अभय खराडे, पत्रकार निरज चांगटे, मयुर चौरे आणि संस्थेचे सर्व माननीय सदस्य उपस्थित होते .