Breaking
ब्रेकिंग

ॐ शिव गोरक्ष योगी आस्थाना एसआयडिसी मध्ये आज संतांचा मेळा

0 3 9 0 3 6

ॐ शिव गोरक्ष योगी आस्थाना एसआयडिसी मध्ये आज संतांचा मेळा

एस डब्ल्यु न्यूज / प्रतिनिधी

नगर-मधील निंबळक बोल्हेगाव रोड,एसआयडिसी येथील ॐ शिव गोरक्ष योगी आस्थाना मध्ये आज दि १४ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सवानिमित्त संतांचा मेळा आयोजित करण्यात आला असून दिवसभर विविध कार्यक्रम होणार असून तिन दिवसीय दत्त याग १०८ हवण कुंड यज्ञची सांगता होणार आहे अशी माहिती मठाधिपती अशोक भाऊ महाराज यांनी दिली .

अवघडपिर सतनाथजी महाराज यांच्या आशीर्वादाने गेल्या वर्षी दत्त जयंतीला ॐ शिव गोरक्ष योगी आस्थाना येथे नवीन बांधण्यात आलेल्या मंदिरात ६ फूट उंचीची मच्छिद्रनाथ मूर्तीची स्थापना करण्यात आली,यावर्षी पहिला वर्धापन दिन व दत्त जयंती निम्मित तिन दिवसीय दत्त याग नाथभक्त अशोक भाऊ यांच्या मार्गदशनाखाली भव्य १०८ हवण कुंड यज्ञ दि १२ ते १४ डिसेंबर पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. तर अहिल्यानगरच्या पावन भुमिमध्ये प्रथमच संतांचा मेळा प्रथमच आयोजित केला आहे यामध्ये देशातून संत महंत येणार आहेत
दि १४ रोजी पहाटे ५ वा आरती होणार असून नंतर गुरुचरित पारायण होणार आहे. सकाळी ७ वा धुनी आरती नंतर हवंन विधी सकाळी ८ ते ११ संत महंतांची भव्य मिरवणूक परिसरातून काढण्यात येणार आहे,दुपारी १२ वा जन्मोत्सव व महाआरती होणार असून नंतर महाप्रसाद होणार आहे व तिन दिवसीय दत्त यागची सांगता होणार आहे .

यावेळी आ शिवाजीराव कर्डीले,आ संग्रामभैय्या जगताप,नगरसेवक कुमारभाऊ वाकळे,माधवराव लामखडे,प्रियंका लामखडे,सरपंच, निंबळक, अविनाश कोतकर,लिंबाशेठदादा नागरगोजे आदींसह अनेक मान्यवर व हजारो भाविक उपस्थित राहणार आहे
तरी सर्व भाविक भक्तांनी सालाबाद प्रमाणे याहीवर्षीही ओम शिव गोरक्षनाथ योगी आस्थाना,श्री बडेबाबा मच्छिंद्रनाथ मंदीर,निंबळक बोल्हेगाव रोड.एसआयडिसी येथील भव्य महाप्रसाद, सतसंग कार्यक्रम व मिरवणुकस उपस्थिती राहावे असे आवाहन करण्यात आले आहे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे