Breaking
ब्रेकिंग

3,00,000/- रुपये रोख रक्कम राहुरी पोलीस स्टेशन कडुन फिर्यादीस परत “

0 8 6 7 0 2

3,00,000/- रुपये रोख रक्कम राहुरी पोलीस स्टेशन कडुन फिर्यादीस परत “

राहुरी तालुका जावेद शेख

मा.पोलीस अधीक्षक सो. अहिल्यानगर , मा.अपर पोलीस अधीक्षक सो. अहिल्यानगर, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सो. श्रीरामपुर विभाग जि.अहिल्यानगर यांचे आदेशान्वये राहुरी पोलीस स्टेशन येथे दाखल होणारे गुन्हयांचा तपास करुन जप्त मुददेमाल फिर्यादीस परत देण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत.
दि. 30/12/2025 रोजी राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नंबर 1313/2024 भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस) 2023 चे कलम 309(6) , 310(2)(4) प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचा तपासामध्ये राहुरी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा जि.अहिल्यानगर या संयुक्त पथकाने गुन्हयाचा तांत्रीक पुराव्याचे आधारे सखोल तपास करुन गुन्हयामध्ये आरोपी निष्पन्न करण्यात आले आहेत व आरोपींकडुन फिर्यादी यांचे 3,00,000 /- रुपये रोख रक्कम 200, 100 दराच्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो. कोर्ट राहुरी यांच्या आदेशान्वये सदर रोख रक्कम फिर्यादी यांचे ताब्यात देण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी मा.श्री.सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा.श्री.सोमनाथ वाघचौरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहिल्यानगर, मा.श्री.जयदत्त भवर मा.उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर जि.अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली , पोलीस निरीक्षक संजय ठेंगे , पो.हे.काँ.विकास साळवे , म पो. हे काँ.कोहोकडे , पो. काँ.आजीनाथ पाखरे यांनी केलेली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 0 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे