ज्येष्ठ शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे सर यांची रयत शिक्षण संस्था उत्तर विभागच्या सल्लागार सदस्य पदी निवड

ज्येष्ठ शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे सर यांची रयत शिक्षण संस्था उत्तर विभागच्या सल्लागार सदस्य पदी निवड
एस डब्ल्यू न्यूज / नेटवर्क
ज्येष्ठ शिक्षक नेते व चिचोंडी पाटील स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री महादेव तथा आबासाहेब कोकाटे सर यांची रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग च्या सल्लागार सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मा. सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे,सरपंच शरदभाऊ पवार,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे,उपसरपंच यशोदाताई कोकाटे,सेवा सोसायटीचे चेअरमन महादेव खडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मा.सरपंच मच्छिंद्र खडके,दिलीप पवार,व्हा.चेअरमन अर्जून वाडेकर,मा.व्हा.चेअरमन डाॅ.मारूती ससे,काशिनाथ बेल्हेकर,मा.चेअरमन आर.एस.कोकाटे,पांडुरंग ससे,मा.उपसरपंच भाऊसाहेब ठोंबरे,महादजी कोकाटे,विश्वसागर कोकाटे,पै.राजू कोकाटे,बाबासाहेब परकाळे,चंद्रकांत पवार,ग्रा.पं.सदस्य प्रशांत कांबळे,संदिप काळे,वैभव कोकाटे,ज्ञानेश्वर ठोंबरे,दत्तू धुळे,कामधेनु पतसंस्थेचे व्हा.चेअरमन प्रमोद पवणे,अजय कांकरिया,देवकर सर,अमोल ठोंबरे,कल्याण कोकाटे,राघू कोकाटे,सेवा सोसायटी संचालक संदीप कोकाटे,दत्तू कोकाटे यांसह गावातील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सभापती इंजि.प्रविण कोकाटे यांनी आबासाहेब कोकाटे सरांनी शाळेसाठी केलेले अथक परिश्रम त्याचबरोबर गावातील सामाजिक कार्यक्रमात सर्वांना योग्य मार्गदर्शन केले असे सांगितले.
सरपंच शरद पवार यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला व त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना रयत शिक्षण संस्थेने मानसन्मान दिला असे म्हणाले.
या नियुक्तीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मान.आमदार आशुतोष काळे त्याचबरोबर माजी आ.दादाभाऊ कळमकर यांचे राजेश परकाळे यांनी आभार मानले.