Breaking
ब्रेकिंग

करमाळा एस टी आगारातील थांबलेल्या विकासकामांना गती मिळावी:- भाजप जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार यांचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांना लेखी निवेदन

0 3 9 0 3 6

करमाळा एस टी आगारातील थांबलेल्या विकासकामांना गती मिळावी:- भाजप जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार यांचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांना लेखी निवेदन

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २६ / करमाळा एसटी आगारातील विकासकामे चालू झाली होती. परंतु स‌द्यस्थीमध्ये काम बंद पडलेले आहेत. मुखमंत्री विकासनिधीमधून ही कामे चालू होती. करमाळा आगारामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी सुशोभीकरण, रस्ते सिमेंटीकरण तसेच मूलभूत सुविधा होणेकामी निधी मंजूर केला होता. परंतु अचानक सर्व कामे अचानक बंद पडलेले आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

करमाळा डेपोतून मोठ्या प्रमाणात प्रवासी नाशिक, मुंबई, पुणे, सोलापूर तसेच तालुक्यामधील प्रत्येक गावातील प्रवासी प्रवास करत असतात तसेच मोठ्या प्रमाणात भरणारी आदिनाथ संगोबा यात्रा महाशिवरात्रीला तसेच मागवारी तसेच तालुक्यातील यात्रा तसेच १० वी व बारवी परीक्षा सुरु झालेल्या आहेत. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात काम रखडलेले असून जागेअभावी बसेस तसेच प्रवाश्याची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तरी या सर्व गोष्टीचा विचार करता बंद पाडण्यात आलेल्या कामाला त्वरित गती देऊन काम सुरु व्हावे अशी विनंती भाजप जिल्हा उपाध्यक्ष शशीकांत पवार यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केले आहे.

सदर प्रती:-
मा. विभाग नियंत्रक, सोलापूर

मा. करमाळा आगर प्रमुख
यांनाही देण्यात आले आहेत.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे