शिष्यवृत्ती परीक्षेत जनता विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम
दहा विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र
वाळकी / प्रतिनिधी : दादासाहेब आगळे
शिष्यवृत्ती परीक्षा सन २०२४-२५ या वर्षाची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून जनता विद्यालय रुईछत्तीशी ता. नगर येथील दहा विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश झाल्याने सर्व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने प्राचार्य दत्ता पाटील नारळे यांच्या हस्ते करण्यात आला.
जनता विद्यालयातील इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत दहा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून विद्यालयाच्या निकालाची परंपरा कायम राखली आहे.
या शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थी विद्यार्थिनी मध्ये गोरे वैष्णवी नवनाथ,भांबरे नुपूर निलेश,झेंडे अर्पिता गणेश, मगर हर्षदा दिपक,निमसे वैष्णवी राजाबापू,निमसे अनुजा शरद,गोरे प्राजक्ता विनोद,शेंडगे सुदर्शन गणेश,टेकाळे भाग्यश्री ज्ञानदेव,अन्हाड माधवी बापू या सर्व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना शिक्षक सचिन काळे,श्रीम.अर्चना लोखंडे, कुमारी प्राजक्ता गीते आदींनी मार्गदर्शन केले.
शिष्यवृत्ती परीक्षेतील या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री रा. ह. दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव श्री विश्वासराव आठरे, सहसचिव श्री जयंतराव वाघ, खजिनदार श्रीम. दीप लक्ष्मी म्हसे, ज्येष्ठ विश्वस्त श्री जी.डी. खानदेशी, श्री नंदकुमार झावरे, श्री सिताराम खिलारी, श्री मुकेश दादा मुळे, प्राचार्य श्री दत्ता पाटील नारळे, पर्यवेक्षिका सौ.तारा पाडळकर व परिसरातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले.



