Breaking
ब्रेकिंग

गुंडेगाव येथे जिल्हा परिषद शाळेत बाल दिंडयांचे आयोजन….

बाल दिंडीतून भक्ती,निष्टा,एकत्र येण्याची शिकवण देत दिला संदेश..

0 7 6 9 3 4

गुंडेगाव येथे जिल्हा परिषद शाळेत बाल दिंडयांचे आयोजन….

बाल दिंडीतून भक्ती,निष्टा,एकत्र येण्याची शिकवण देत दिला संदेश..

वाळकी / प्रतिनिधी : दादासाहेब आगळे

गेली पाच वर्षांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुताळमळा , हराळमळा येथे पारंपरिक भक्तिभावाने बाल दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे. वारी संस्कृती, विठ्ठल भक्ती आणि समाजशीलता याचे महत्त्व बालवयातच विद्यार्थ्यांच्या मनावर ठसावे, यासाठी या उपक्रमाची शाळेमार्फत सुरूवात झाली आहे.
या वर्षीही मोठ्या उत्साहात दिंड्या काढण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात, ‘माऊली माऊली’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या जयघोषात सहभाग घेतला. पारंपरिक पोशाख, भगवे फेटे, विठ्ठल-रुख्मिणीचे स्वरूप साकारत विद्यार्थ्यांनी परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण केले. तर विद्यार्थ्यांना महाप्रसादाची व्यवस्था माजी उपसरपंच सुनील भापकर, महिंद्रा कुताळ यांच्या वतीने करण्यात आली होती.
या उपक्रमाविषयी जिल्हा परिषद प्राथमिक कुताळमळा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिपस्वी पवार म्हणाल्या, “वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती भक्ती, निष्ठा आणि एकत्र येण्याची शिकवण देते. मुलांना बालवयातच वारी म्हणजे काय, विठ्ठल-पांडुरंग म्हणजे काय हे समजले पाहिजे, यासाठीच आम्ही हा उपक्रम सातत्याने राबवत आहोत.

यावेळी गुंडेगाव येथील कुताळमळा, हराळमळा येथील पालक व ग्रामस्थ यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले असून विद्यार्थ्यांमध्ये भक्तीची गोडी निर्माण करणाऱ्या या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळेची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कुताळमळा शाळेच्या मुख्याध्यापिका दिपस्वी पवार, भुजबळ,सह शिक्षिका शितल इंगळे, अंगणवाडी सेविका कांचन भापकर,आशा सेविका प्रिती भापकर, मनिषा कुताळ,यांनी परीश्रम घेतले. तर शिक्षण विस्तार अधिकारी मंदा जगताप -माने ,केंद्र प्रमुख उत्तम भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे