Breaking
ब्रेकिंग

अरविंद पाशिलकर यांची कन्या डॉ. समृद्धी हिचा विवाह संपन्न

0 3 9 0 2 3

अरविंद पाशिलकर यांची कन्या डॉ. समृद्धी हिचा विवाह संपन्न

प्रतिनिधी :  राजेश बाष्टे

अरविंद पाशिलकर यांची कन्या डॉ. समृद्धी हिचा विवाह संपन्न अनेक मान्यवरांची विवाह सोहळ्याला उपस्थिती
अलिबाग (प्रतिनिधी) रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर व परहूर ग्रामपंचायत माजी सरपंच अरविंद धोंडू पाशिलकर यांची कन्या डॉक्टर समृद्धी हिचा विवाह चिरंजीव यश यांच्यासोबत नुकताच संपन्न झाला. यावेळी राजकीय,सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध ठेकेदार व परहूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच अरविंद धोंडू पाशिलकर यांची कन्या डॉ.समृद्धी हीचा शुभविवाह बुधवार दिनांक २७/११/२०२४ रोजी वसंत यशवंत माळकर रा.तुळस वेंगुर्ला सिंधुदुर्ग यांचा सुपुत्र चिरंजीव यश यांच्या सोबत तळवडे अलिबाग येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी दोन्ही वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी अलिबाग मुरुड रोहा मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार सुभाष उर्फ पंडित शेठ पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील, जिल्हा परिषदच्या माजी सदस्या मानसी ताई दळवी, राजश्रीताई मिसाळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजन भाई नार्वेकर,भाजपा चे पदाधिकारी राजू साळुंखे ,अलिबाग चे माजी नगरसेवक बाळू पवार, काँग्रेस ओ बी सी सेल चे जिल्हाअध्यक्ष सुनील थळे,रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाउंडेशन व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र चे रायगड जिल्हाध्यक्ष अँड.रत्नाकर पाटील,श्रीवर्धन रानवली चे सरपंच सुरेश मांडवकर, परहूर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रफुल्ल पाटील, माजी सरपंच तुकाराम सावणेकर ,जे. पी.घरत तसेच रायगड जिल्हा परिषदेचे अलिबाग पनवेल चे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर, रायगड जिल्हा परिषद रोहा उप अभियंता युवराज गांगुर्डे, महाजन साहेब, म्हसळा श्रीवर्धन चे उपअभियंता सैफाली देशमुख व कर्मचारी वर्ग, माणगाव चे उपअभियंता प्रशांत म्हात्रे, श्रीवर्धन चे मालोदे साहेब,धामणकर,सुर्वे, सावंत व रायगड जिल्हा परिषद कर्मचारी वर्ग, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे