Breaking
ब्रेकिंग

महाराज सेवा समितीच्या वतीने ज्येष्ठांचा सन्मान व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

0 8 6 7 0 5

महाराज सेवा समितीच्या वतीने  ज्येष्ठांचा सन्मान व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील

जळगाव : अमळनेरकर महाराज सेवा समितीच्यावतीने रविवार ५ रोजी संध्याकाळी ५ वाजता नेरी नाक्याजवळील पांजरपोळ संस्थानात जळगावातील ज्येष्ठ मान्यवरांचा सत्कार व पुरस्कार वितरण सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी संत सखाराम महाराज (विद्यमान गादीपती हभप प्रसाद महाराज) यांची तुला करण्यात येणार आहे. मागील तीन वर्षांपासून संस्थेच्यावतीने विविध क्षेत्रात अनेक वर्षांपासून सेवा देणाऱ्या ज्येष्ठ
मान्यवरांचा संत सखाराम महाराज यांचे हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.
यावर्षी अन्वा संस्थानचे हभप ज्ञानेश्वरमाऊली महाराज चातुर्मास्ये. वेशास देवेंद्रशास्त्री रामचंद्र गढीकर, धोंडू माळी, महेश महाराज त्रिपाठी, रुपचंद महाराज औरंगपूरकर, डॉ. गिरीश सहस्रबुद्धे याना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. हभप परागमहाराज चातुर्मास्ये यांचे अध्यात्मिक शक्ती जीवनाशी कशी निगडित आहे याविषयावर प्रवचन होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे