Breaking
ब्रेकिंग

घनकचरा व्यवस्थापनाकडे कचरा उचलण्याची मागणी

0 8 6 5 2 9

*घनकचरा व्यवस्थापनाकडे कचरा उचलण्याची मागणी*

राहुरी तालुका जावेद शेख

येथील वॉर्ड क्र.२ मधील पाटाच्या कडेस “वैदूवाडा पुल ते दाळवाले चाळ पर्यंत” नगर पालिका प्रशासनाने सिमेंट क्रॉंकिटचा रस्ता बनवला याबाबत नगर पालिका प्रशासनास धन्यवाद.

मात्र याठिकाणी पाटाच्या कडेला जो कचरा टाकला जातो यामुळे परिसरात दुर्गंधी तर पसरतेच शिवाय या कचऱ्यामुळे मोकाट कुत्रे आणी डुकरे यांनी अक्षरशः धुमाकूळ माजवला आहे,
तसेच या रस्त्यावर शालेय विद्यार्थी, महिला, मुले, वयोवृद्ध यांच्या ये जा ची मोठी वर्दळ असल्याने तथा याठिकाणी पाटाच्या कडेला असलेल्या वाढलेले गवत आणी अनावश्यक झाडा झुडपात डुकरे दिवसभर लपून बसलेली असतात, कोणी कचरा टाकल्यास त्यावर ताव मारण्यासाठी कुत्रे व डुकरे कचऱ्यावर तुटून पडतात, कधी काळी नागरीकांच्या अंगावर धावूनही येतात यामुळे भविष्यात काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता ही नाकारता येत नाही,तसेच सदरील कचरा हा काही वेळा पाटाच्या पाण्यात जातो आहे तर काही वेळा रस्त्यावर येत असल्याने रस्त्यावरुन ये – जा करणाऱ्या नागरीकांना दुर्गंधीसोबतच मोठ्या त्रासाचा सामना करणे भाग पडत आहे. करीता घनकचरा व्यवस्थापन विभागाने दररोजच सदरील ठिकाणचा कचरा उचलत जावा यासोबतच सदरील ठिकाणचे गवत व अनावश्यक झाडे झुडपे काढणेकामी नगर पालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, ज्यामुळे परिसरातील नागरीकांच्या समस्या दुर होवू शकतील अशी परिसरातील नागरीकांकडून मागणी केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे