Breaking
ब्रेकिंग

केशर डेअरी ते वरवंडी फाटा रस्त्याला वाली कोण ?

रस्ता दुरुस्तीची नागरिकांची वाहनधारकांची मागणी

0 3 9 0 4 0

केशर डेअरी ते वरवंडी फाटा रस्त्याला वाली कोण ?

रस्ता दुरुस्तीची नागरिकांची वाहनधारकांची मागणी

राहुरी तालुका जावेद शेख

राहुरी तालुक्यातील केशर डेअरी ते वरवंडी चौक या रस्त्याची अतिशय दैनिय अवस्था झाल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहने कशी चालवावी असा प्रश्न पडला असून या रस्त्याला वाली कोण ? असा प्रश्न नागरिकांना वाहनधारकांना पडला आहे.
रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने वाहनधारकांना रस्ता सोडून दुसरीकडून मार्ग अवलंबलेला आहे आणि त्याच रस्त्याने येथील शेतकऱ्यांना वाहनधारकांना ये जा करावी लागत आहे. सध्या अवकाळीने कहरच केल्याने तालुक्यातील अनेक रस्त्यांची वाट लागली आहे यापैकी हा एक रस्ता आहे.येथील नागरिकांनी अनेक वेळा याबाबत तक्रारी केल्या मात्र संबंधित ग्रामपंचायत याची दखल घेत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे.

निवडणुकीच्या काळामध्ये अनेक पुढारी निवडून येण्यापुरते आश्वासने देतात मात्र निवडून आल्यानंतर ही आश्वासने आश्वासनेच राहतात. दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा हा रस्ता असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या बसेस व शेतकरी शेतमालाची वाहतो करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने नागरिकांनी वाहनधारकांनी करायचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तरी संबंधित ग्रामपंचायत व जिल्हा परिषद याकडे त्वरित लक्ष देऊन या रस्त्याचे काम करावे अशी मागणी वरवंडी येथील नागरिकांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे