ॲड. चंद्रभान पाटील यांचा नवीन विक्रम ; टाटा अल्ट्रा मॅरेथॉन मधील अंतर 5 तासात पुर्ण
जिद्द व चिकाटीच्या जोरावर शिक्षक ते इंटरनॅशनल रनर असा प्रवास :- ॲड. चंद्रभान पाटील*

ॲड. चंद्रभान पाटील यांचा नवीन विक्रम ; टाटा अल्ट्रा मॅरेथॉन मधील अंतर 5 तासात पुर्ण
*जिद्द व चिकाटीच्या जोरावर शिक्षक ते इंटरनॅशनल रनर असा प्रवास :- ॲड. चंद्रभान पाटील*
प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर शहरातील नामांकीत असलेली स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिखर अकॅडमी यांचे संचालक यांनी नुकताच टाटा अल्ट्रा मॅरेथॉन लोणावळा 50 km अंतर अवघ्या 5 तासात पूर्ण. सह्याद्री पर्वतातील डोंगर, दऱ्या व टेकड्यांमध्ये आव्हानात्मक अशी असल्यामुळे आशिया खंडातील प्रतिष्टीत मॅरेथॉन म्हणून ओळखली जाते.
समाजातील तरुण मुलामुलीसाठी खुप मोठा
आदर्श सरांनी दिलेला आहे.अवघ्या 1 वर्षात अल्ट्रा रनर होण्याचा मान.सरांनी सुद्धा 42 km मॅरेथॉन 3 तास 55 मिनिटात पूर्ण केलेली असुन तसेच 21 km 7 मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत पण यातील सर्वोत्तम वेळ 1 तास 42 मिनिट आहे.
अमळनेरच्या इतिहासातील 1 ला अल्ट्रा रनर तसेच वेगवान रनर चा मान अँड. चंद्रभान पाटील यांना मिळालेला आहे.दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या व प्रतिष्टीत अशा कॉम्रेड मॅरेथॉनसाठी पात्र ठरलेले आहे.
हि स्पर्धा नोव्हेंबर 2026 मध्ये 100 कि.मी. चा बॉर्डर रन करणार आहेत. जिद्द व चिकाटीच्या जोरावर शिक्षक ते इंटरनॅशनल रनर असा प्रवास सरांनी पुर्ण केलेला आहे.



