जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेत गुंडेगाव श्री समर्थ ज्युनिअर कॉलेजने केली विजयाची हॅट्रिक…
*जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेत गुंडेगाव श्री समर्थ ज्युनिअर कॉलेजने केली विजयाची हॅट्रिक…*
वाळकी / प्रतिनिधी : दादा आगळे
अहिल्यानगर येथे १३ आक्टोंबर रोजी यावर्षीच्या झालेल्या जिल्हास्तरीय शालेय पावसाळी क्रीडा स्पर्धा वाडियापार्क मध्ये पार पडल्या असता डॉजबॉल या खेळामध्ये १९ वर्ष मुले वयोगटात नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील श्री समर्थ जुनिअर कॉलेजच्या संघाने श्री मारुतीराव कोते कॉलेज अकोले या संघाचा पराभव करून सलग तिसऱ्या वर्षी जिल्ह्यामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला असुन महाविद्यालयाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
या विजयाबद्दल विद्यार्थी खेळाडूंचे कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष रंगनाथ कळमकर साहेब, मा.जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, राज्य क्रीडा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर सर,थोर समाजसेवक राजाराम भापकर गुरूजी,महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील इंगळे सर,गुंडेगावचे उपसरपंच नानासाहेब हराळ, विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन छबुराव हराळ,ग्रामपंचायत सदस्य संजय कोतकर,सुनिल भापकर, पत्रकार दादासाहेब आगळे पालक,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
या खेळाडूंना महाविद्यालयाचे शिक्षक फिरोज पठाण,राजेंद्र राऊत,श्रीमती सोनाली सरोदे यांनी मार्गदर्शन केले होते.



