Breaking
ब्रेकिंग

“सारे जहासे अच्छा” या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद: बी.बी.ए. व बी.बी.ए. (आय. बी.) विभागाचा अनोखा उपक्रम”

0 8 6 7 4 2

“सारे जहासे अच्छा” या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद: बी.बी.ए. व बी.बी.ए. (आय. बी.) विभागाचा अनोखा उपक्रम”

प्रतिनिधी : संवेद वायकर

अहिल्यानगर: विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सर्वधर्म समभाव, देशाप्रती निष्ठा तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या थोर देशभक्त, शहीद स्वातंत्र्य सैनिकांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी व उत्साहाने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी दरवर्षी बीबीए व बीबीए (आय.बी.) विभागाच्या वतीने “सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा” या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाचा समारोप 15 ऑगस्ट रोजी होणार आहे
कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी केले याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. संजय कळमकर, बीबीए व बीबीए (आयबी) विभाग प्रमुख प्रा. डॉ. मंगेश वाघमारे, प्रा. डॉ. सतीश जगताप उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बीबीए आणि बीबीए (आय.बी) चे विभाग प्रमुख प्रा. डॉ. मंगेश वाघमारे यांनी विभाग स्वातंत्र्य दिनाच्या पाश्र्वभूमीवर दरवर्षीच नवनवीन कार्यक्रमांचे आयोजन करत असतो. या वर्षी पोस्टर मेकिंग काॅम्पेटिशन, रील मेकींग काॅम्पेटिशन, देशभक्तीपर संगीत मैफिल यांचे आयोजन करण्यात आले होते, त्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे हे होते आपल्या अध्यक्षीय भाषणात स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देताना आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेले नसून त्यामागे हजारोंचे बलिदान व त्याग आहे असे त्यांनी सांगितले व त्यांनी शहिदांना अभिवादन केले. दरवर्षी बीबीए विभाग नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत असतो व यातूनच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास, वक्तृत्व विकास होत असतो असे त्यांनी नमूद केले.
सदर कार्यक्रमात सारे जहा से अच्छा हिंदुस्ता हमारा या विषयावर विद्यार्थ्यांनी पोस्टर बनवले होते. मयुर रासकर, सायली माहेश्वरी, ज्ञानेश्वरी म्हसे, व वैष्णवी शेलार यांनी देशभक्तीपर गीते सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच बी.बी.ए. विभागातील राधिका देशपांडे, वैष्णवी चव्हाण, आणि श्रुती अटोळे यांनी उत्कृष्ट वक्तृत्व केले. या तीन दिवसीय कार्यक्रमाचे संयोजन प्रा. अनिता पेटकर यांनी केले. याप्रसंगी विभागातील डॉ. राहुल थोरात, प्रा. अभिजीत सातभाई, प्रा. श्यामल जाधव, प्रा. नम्रता ठाकर, व डॉ. रूपाली मिस्कीन हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षाचे विद्यार्थी निकीता गांधी व आदित्य रुईकर यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. अनिता पेटकर यांनी केले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे