राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या तालुका अध्यक्षपदी श्री भागवत पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी विजय पाटील यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या तालुका अध्यक्षपदी श्री भागवत पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी विजय पाटील यांची नियुक्ती
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव :- एरंडोल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तालुका अध्यक्षपदी उत्राण अ.ह. येथील श्री भागवत भिकन पाटील यांची तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी विजय पाटील यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संजय मुरलीधर पवार यांनी एका पत्रकांनव्ये केली आहे.
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात माजी मंत्री सतीश पाटील व माजी मंत्री गुलाबराव देवकर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते भागवत पाटील तसेच राष्ट्रवादी युवक ता अध्यक्ष विजय पाटील यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस मजबुतीसाठी आपण माजी मंत्री सतीश पाटील यांच्या नेतृत्वात प्रयत्न करू व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाला चांगले यशमिळवण्यासाठी आपले प्रयत्न राहतील अशी प्रतिक्रिया भागवत भिकन पाटील यांनी दिली
भागवत पाटील यांच्या पत्नी शारदा पाटील या पंचायत समितीच्या माजी सदस्य तसेच उत्राण अ.ह. येथील माजी सरपंच आहेत.