Breaking
ब्रेकिंग

राहुरी फॅक्टरीत ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमात महिलांनी लुटला मनमुराद आनंद

0 3 9 2 4 2

राहुरी फॅक्टरीत ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमात महिलांनी लुटला मनमुराद आनंद

राहुरी अहमदनगर वृत्तसेवा : जावेद शेख

देवळाली प्रवरा येथील सत्यजित कदम फाउंडेशनच्यावतीने जागतिक महिला दिनाच्या औचित्ताने पार पडलेल्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांना ‘ सन्मान माहेरचा’ पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला. तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

प्रीती सत्यजित कदम यांच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे मेजवानी देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील महिलांना उपलब्ध करून दिली जाते. यंदाही गुढीपाडव्याच्या दिवशी राहुरी फॅक्टरीतील वृंदावन कॉलनी येथे सांगली येथील नितीन गवळी निर्मित होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला.तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई अनंत पवार यांना प्रदान करण्यात आलेला सन्मान माहेरचा हा पुरस्कार अंजली भोसले व नंदा शिवतारे यांनी स्वीकारला. तर तेजस्विनी सूर्यवंशी, प्रियांका काळाने, अनुराधा मंडलिक, न्यायाधीश हर्षदा आदमाने, डॉ.गीतांजली बोरुडे, सरोजिनी फडतरे, डॉ.प्रीती मोरे यांना सन्मान माहेरचा तर चंद्रप्रभा जाधव, प्रिया जाधव, आरती जाधव, शोभा चोरडिया, अनुपमा चोरडिया, श्रद्धा चोरडिया, समाबाई टकले, अर्चना टकले, सोनाली टकले यांना ‘कै.प्रिया चंद्रशेखर कदम उत्कृष्ट सासू -सून’ पुरस्काराने गौरविण्यात आले. राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरातील भजनी मंडळाचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी देवळाली प्रवरातील महिलांनी ढोल वादन सादर करून सर्वांची वाहवा मिळविली. तर देवळालीतील भजनी मंडळाने टाळ मृदुंगाच्या गजरात विठुरायाच्या गीतावर नृत्याविष्कार करून उपस्थितांची मने जिंकली. किरण इघे व रोहिणी कराड यांनी उत्कृष्ट रॅम्प वॉक केला. लकी ड्रॉमध्ये अश्विनी इथापे, छाया खुरपे, मंजुषा सोनवणे या भाग्यवान विजेत्या ठरल्या.

यावेळी ज्योती ढुस, अनुजा महांकाळ, धनश्री कड, मंदाताई शेटे या होम मिनिस्टर कार्यक्रमात
विजेत्या ठरल्या आहेत.या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, प्रीती कदम, अजित सूर्यवंशी आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी उर्मिला शेटे, अनिता वीर, अनुजा कदम, मीना शेटे, अनुजा मुळे, साधना कदम, सुप्रिया शिंदे, अंजली अंबिलवादे, उमा कदम, स्वरूपा कदम, उज्जवला कदम व सत्यजित कदम फाउंडेशनच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन जयश्री कोठुळे व गायत्री कदम यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 2 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे