भोसले दाम्पत्याने पुन्हा पूर्ण केली सातारा हिल हाफ मॅरेथॉन; जिद्द, फिटनेस आणि साथीदारीचे उदाहरण

भोसले दाम्पत्याने पुन्हा पूर्ण केली सातारा हिल हाफ मॅरेथॉन; जिद्द, फिटनेस आणि साथीदारीचे उदाहरण

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ०६/ “एकत्र धावूया, निरोगी राहूया” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत डॉ. महेश भोसले व डॉ. अपर्णा भोसले यांनी सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

अत्यंत खडतर आणि डोंगराळ मार्गावर आयोजित करण्यात आलेली ही २१ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन भोसले दाम्पत्याने सलग दुसऱ्यांदा पूर्ण केली. साताऱ्याच्या डोंगराळ परिसरातील चढ-उतार आणि दमट हवामानामुळे स्पर्धा अधिक आव्हानात्मक बनली होती. मात्र, नियमित व्यायाम, धावण्याचा सराव आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर दोघांनीही हे आव्हान स्वीकारून यशस्वीरित्या पूर्ण केले.
त्यांच्या कामगिरीमुळे तरुणांसह सर्व वयोगटातील नागरिकांना आरोग्य आणि फिटनेसची प्रेरणा मिळत आहे. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


