Breaking
ब्रेकिंग

निर्मलनगर येथे श्री गणेश प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न

नवसाला पावणारा गणपती अशी पावन गणपतीची सर्वदुर ख्याती

0 8 6 5 1 5

निर्मलनगर येथे श्री गणेश प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न

नवसाला पावणारा गणपती म्हणून या पावन गणपतीची सर्वदुर ख्याती – नगरसेवक निखिल वारे

प्रतिनिधी : संवेद वायकर

अहिल्यानगर : उपनगरातील सावेडी भागात निर्मलनगर येथील गाडेकर चौक येथे नवीनच निर्माण केलेल्या अत्यंत आकर्षक पावन श्री गणेश मंदिर येथे निर्मलनगर प्रतिष्ठान च्या वतीने आमदार श्री. संग्राम भैय्या जगताप आणि आमदार श्री. अक्षय दादा कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीगणेश प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत उत्साहात व आनंदात संपन्न झाला .शहापूरचे वृंदावन आश्रम येथील सुप्रसिद्ध महंत बालयोगी गुरुवर्य शिवदत्त बाबा यांच्या पवित्र पावन हस्ते श्री कलशाची विधिवत स्थापना करण्यात आली . नवसाला पावणारा गणपती म्हणून या पावन गणपतीची सर्वदुर ख्याती आहे . संपूर्ण पंचक्रोशीतुन गणेशभक्त या मंगलमय सोहळ्यात सहभागी झाले .

या शुभ प्रसंगी १२ सप्टेंबर २०२६ रोजी प्रथम श्री गणेश मूर्तीची सुंदर व आकर्षक रथात अतिभव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली .१३ सप्टेंबर रोजी मान्यवर २१ पतीपत्नी जोडयांच्या उपस्थितीत श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात करण्यात आली.

श्री दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळ द्वारा सामूहिक श्री हनुमान चालीसा पाठ व भजन संध्या मोठ्या भक्तिभावात संपन्न झाली . त्यानंतर भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले . ३००० पेक्षा अधिक गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .श्री गणरायाचा मंगलमय सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक भक्त महिला नागरिक सहकुटुंब उपस्थित होते . आयोजक निर्मलनगर प्रतिष्ठानच्या या धार्मिक व आनंददायी कार्याचे सर्व सामाजिक राजकिय स्तरातून कौतुक होत आहे .

निर्मलनगर प्रतिष्ठान पावन गणपती मंदिराच्या अभुतपूर्व श्री गणेश प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा मी साक्षीदार असून अशा रोमहर्षक उल्लेखनीय धार्मिक कार्यात एक भक्त म्हणून मी सहभागी झालो ही माझ्यासाठी खुप आनंदाची गोष्ट आहे .नवसाला पावणारा गणपती म्हणून या पावन गणपतीची सर्वदुर ख्याती आहे – नगरसेवक निखिल वारे

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे