६वी महाराष्ट्र राज्य मिक्स बॉक्सिंग स्पर्धा मुंबई येथे यशस्वीरीत्या संपन्न.*
*६वी महाराष्ट्र राज्य मिक्स बॉक्सिंग स्पर्धा मुंबई येथे यशस्वीरीत्या संपन्न.*
राहुरी तालुका जावेद शेख
रविवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी गोरेगाव, मुंबई येथे राज्यस्तरीय मिक्स बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. अँमच्युर मिक्स बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संलग्न युथ मिक्स बॉक्सिंग असोसिएशन मुंबई उपनगर वतीने ही स्पर्धा गोरेगाव,मुंबई येथे पार पडली.
या स्पर्धेचे मुख्य अतिथी श्री.राकेश म्हसकर सर (संस्थापक तथा सचिव – भारतीय मिक्स बॉक्सिंग महासंघ), श्री. प्रशांत मोहिते सर (अध्यक्ष – अँमेंच्युर मिक्स बॉक्सिंग असोसिएशन, महाराष्ट्र) श्री.पंकज पिंपळे सर (शाळा विभाग – प्रशासकीय अधिकारी ब्रहमुंबई महानगरपालिका), श्री.रोहित शेलार साहेब (विशेष सहकारी अधिकारी), श्री.नारायण कराळे सर (महासचिव – अँमेंच्युर मिक्स बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र), श्री. सागर शेलार सर (तांत्रिक संचालक – अँमेंचर मिक्स बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र), श्री.गणेश पेरे सर (अध्यक्ष – स्पर्धा आयोजन समिती महाराष्ट्र),श्री. गोरखनाथ ढवल सर (महाराष्ट्र प्रशिक्षक), श्री.संदेश नाईक सर (अध्यक्ष – युथ मिक्स बॉक्सिंग असोसिएशन मुंबई उपनगर), श्री.राजू मोरे सर (सचिव – युथ मिक्स बॉक्सिंग असोसिएशन मुंबई उपनगर), श्री.अंबादास पंत सर (सदस्य – युथ मिक्स बॉक्सिंग असोसिएशन मुंबई उपनगर), श्री.आशुतोष पांडे सर (सूत्र संचालक) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेची राष्ट्रगीत,महाराष्ट्र गीत याने सुरुवात करण्यात आली.
या स्पर्धेमध्ये साधारण २५०च्या आसपास खेळाडूंनी सहभाग घेतला होता.यामध्ये श्री.विकास मोरे सर ,श्री.दिपक पंत सर (मुंबई उपनगर) श्री.महेंद्र राजे सर (मुंबई शहर), नासिर मुलाणी (ठाणे), सौ.पल्लवी म्हात्रे मॅडम (पालघर), श्री.अतेश साळवी सर (रायगड), श्री.रवी बारापात्रे सर (नागपूर), श्री. अरुण पाईकडे सर (छत्रपती संभाजी नगर), श्री.विनोद दाढे सर (नांदेड), श्री.हरी सानप (अहिल्यानगर), स्वप्नील सोनवणे (नवी मुंबई), श्री.अनिल सहारे (गोंदिया), पुणे,नाशिक, सातारा,सांगली,कोल्हापूर,रत्नागिरी, सिंधुदुर्ग,यवतमाळ,वाशिम,भंडारा, अकोला,परभणी,सोलापूर या जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
श्री.विनायक सकपाळ सर (आंतरराष्ट्रीय – मुख्य पंच),सौ.अश्विनी चव्हाण मॅडम (आंतरराष्ट्रीय – मुख्य पंच) यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धा यशस्वी रित्या पार पडत असताना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्यातील स्पर्धेचे पंच श्री. योगेश पाटील सर, श्री.रोहन शेवाळे सर, सौ.तृप्ती लाड मॅडम, श्री.संजय सकपाळ सर,श्री.अवधूत घरट सर, सिद्धी सकपाळ मॅडम, सौ.अनिता पाटील मॅडम, सौ.तन्वी मानकर मॅडम, श्री.योगेश वारगुडे सर, श्री. सचिन प्रजापती सर, सौ.भाग्यश्री मोरे मॅडम,श्री.हितेश भगत, देवाशीस माझी सर, श्री.प्रथमेश म्हामुलकर सर, श्रेयस म्हसकर सर, यांच्या सहकाऱ्याने स्पर्धेचे अंतिम निकालाचे काम केले.
*६ वी राज्यस्तरीय मिक्स बॉक्सिंग* स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक – रायगड, द्वितीय क्रमांक – नवी मुंबई, ठाणे, तृतीय क्रमांक – मुंबई उपनगर, चतुर्थ क्रमांक – मुंबई शहर या स्पर्धेचे मानकरी ठरले. सर्व खेळाडू,पालक व जिल्हा प्रतिनिधीनी स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.



