भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत बांभोरी येथील इंजिअरिंग कॉलेजच्या मेस चालकाचा जागीच मृत्यू
भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत बांभोरी येथील इंजिअरिंग कॉलेजच्या मेस चालकाचा जागीच मृत्यू
प्रतिनिधी :- पंकज पाटील
जळगाव :- जळगाव शहरातून गेलेल्या महामार्गावरील अपघाताची मालिका थांबताना दिसत नसून अशातच भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत बांभोरी येथील इंजिअरिंग कॉलेजच्या मेस चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.
या घटनेबाबत असे की, बांभोरी येथील इंजिअरिंग कॉलेजचे मेस चालक पंकज शालिग्राम शर्मा (वय ६०, रा. प्रेमनगर) हे बुधवारी बुलेटने घराकडे निघाले असताना खोटेनगर ते मानराज पार्क दरम्यान उड्डाणपुलावर ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अमळनेर येथील बैठक आटोपून जिल्हा परिषदेचे सीईओ श्री. अंकित हे जळगावात येत होते, उड्डाणपुलावर त्यांना अपघात दिसताच, ते मदतीसाठी धावून आले. त्यानंतर रुग्णालयात वैद्यकिय अधिकाऱ्यांनी शर्मा यांना तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. यावेळी रुग्णालयात नातेवाइकांसह मित्र मंडळींची गर्दी झाली होती.दरम्यान, अपघातानंतर ट्रॅक्टर चालक तेथून पसार झाला.