शहिद अरुणकुमार वैद्य यांच्या तैलचित्राचे अनावरण प्रजासत्ताक दिनापूर्वी — पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे
शहिद अरुणकुमार वैद्य यांच्या तैलचित्राचे अनावरण प्रजासत्ताक दिनापूर्वी — पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे
अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे
माजी लष्कर प्रमुख तथा अलिबागचे सुपुत्र “शहिद” अरुणकुमार वैद्य यांच्या तैलचित्राचे अनावरण उद्याच्या प्रजासत्ताक दिनापूर्वी केले जाईल ” असे श्री . सोमनाथ घार्गे , पोलिस अधिक्षक रायगड यांनी आज सांगितले .
भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल अरूणकुमार वैद्य लष्कर प्रमुखपदावर असताना शिखीस्तान चळवळ समूळ नष्ट होण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदैशानुसार लष्कर प्रमुखांनी पंजाब येथील सुवर्ण मंदिरात आॕपरेशन ब्ल्यूस्टार केले. त्यामुळे वैद्य साहेब शिखी अतिरेक्यांच्या हिटलिस्टमध्ये गेले. पण अरुणकुमार लष्कर प्रमुख पदादावरून निव्रुत्त होताच त्यांची
“सिक्युरिटी” काढून घेण्यात आली. ही संधी साधून शीख अतिरेक्यांनी त्यांची पुणे येथे दि. १० आ़ॕगष्ट १९८६ रोजी हत्या केली.
“शहिद” जनरल वैद्य यांची स्म्रुती
जाग्रुत होण्यासाठी त्यांचे तैलचित्र पोलिस अधिक्षक यांच्या कार्यालयासमोरील भिंत वजा कठड्यावर लावावै ” अशी लेखी मागणी ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांनी दि . १० /२ /२४ रोजी पोलिस अधिक्षक श्री .घार्गे यांच्याकडे केली . सोबत अ़़ॕड. अजय उपाध्ये व अ़़ॕड. प्रमोद पाटील होते . नंतर पत्रकार वालेकर यांनी सतत पाठपुरावा केला. मधल्या काळात उपोषण करण्याचा इरादाही पोलिस अधिक्षक यांना कळविला. दि. १७ जानेवारी रोजी पोलिस अधिक्षक श्री . घार्गे यांच्याशी दूरध्वनीमार्फत संपर्क साधला असता *शहिद अरुणकुमार वैद्य यांच्या तैलचित्राचे अनावरण परवाच्या प्रजासत्ताक दिनापूर्वी केलेजाईल* असे पोलिस अधिक्षक यांनी सांगितले .