Breaking
ब्रेकिंग

डी पॉल पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0 3 9 0 3 3

डी पॉल पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 एस डब्ल्यु न्यूज / वृत्तसेवा :  जावेद शेख

देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी येथील डी पॉल पब्लिक स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशभक्तीने भरलेला हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून शहरातील सुप्रसिद्ध विधिज्ञ आणि समाजसेवक ऍडव्होकेट मोहसिन शौकत शेख यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
भारतीय राष्ट्रध्वज फडकवून
कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्राचार्य फादर शिजो यांच्या हस्ते ध्वज पडकवीत ध्वजास मानवंदना देण्यात आली.
तर राष्ट्रगीताने संपूर्ण परिसरातील वातावरण राष्ट्रप्रेमाने भारावून गेले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे मन जिंकले. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती, संविधानाचे महत्त्व आणि सामाजिक प्रश्नांवर आधारित नृत्य, नाटके आणि भाषणे सादर करून उपस्थितांना थक्क केले.

*कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण*
*ठरला पुरस्कार वितरण सोहळा*
मुख्य अतिथी ऍडव्होकेट मोहसिन शेख यांच्या हस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना आणि विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांचे कौतुक करताना त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मुख्य अतिथी
ऍडव्होकेट मोहसिन शेख यांनी आपल्या भाषणात दोन महत्त्वाच्या विषयांवर विशेष भर दिला त्यात १) भारतीय संविधानाचे महत्त्व आणि, २) सायबर गुन्हेगारीपासून तरुण पिढीचे संरक्षण
ऍड. शेख त्यांनी संविधानाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, “आपल्या देशाच्या प्रगतीसाठी संविधानाचे पालन खुपच अत्यावश्यक तीतकेच महत्वाचे आहे. तरुणांनी संविधानाचे अध्ययन करून त्याचा आदर केला पाहिजे.” तसेच सायबर गुन्हेगारीवर बोलताना त्यांनी आधुनिक युगातील धोके आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांवर प्रकाश टाकला.त्यांच्या प्रेरणादायी विचारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

शाळेच्या व्यवस्थापनाचे कौतुक . . .

कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी शाळेचे प्राचार्य फादर शिजो, उपप्राचार्य सिस्टर दीप्ती मॅडम,अशोक
पवार सर आणि संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पार पाडली. त्यांच्या अथक मेहनतीमुळेच कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला. व्यवस्थापनाने सर्व लहानसहान गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवत कार्यक्रम अधिक भव्य आणि आकर्षक बनवला.
कार्यक्रमास पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांनी शाळेच्या उत्तम आयोजनाची आणि मुख्य अतिथींच्या मार्गदर्शनाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

*देशभक्तीची प्रेरणा आणि नवी ऊर्जा*
हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा विद्यार्थ्यांना देशप्रेम, संविधानाबद्दल आदर आणि आधुनिक समस्यांवर जागरूकता यासाठी प्रेरणादायी ठरला. डी पॉल इंग्लिश स्कूलने अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या उच्च स्तर गाठण्याचा आदर्श घालून दिला आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांचे योगदान अमूल्य ठरले. असा प्रेरणादायी आणि रंगतदार कार्यक्रम अनुभवण्यासाठी उपस्थित सर्वांनी उत्सुकतेने सहभाग घेतला.
यावेळी डी पॉल पब्लिक स्कूल मुख्याध्यापक फादर शिजो,सिस्टर दीप्ती, अशोक पवार सर, आशिष अमोलिक, बाबासाहेबाचे मते, संदीप जाधव, सोनम वधवा, स्मिता कांबळे, करुणा पाटील, हेमा कोहाले,जॉन सर इत्यादी उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे