Breaking
ब्रेकिंग

शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न

0 3 9 0 2 7

शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २०/ शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली. सर्वप्रथम संघर्ष समितीच्या कार्यालयात शिवजयंती निमित्त उपस्थित कार्यकर्त्यांकडून महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे म्हणाले कि, आज समाजाचे प्रबोधन करण्यासाठी किंवा महापुरुषांचे विचार, कार्य सर्वांना माहित व्हावे यासाठी विविध चित्रपटांची निर्मिती केली जाते. परंतू सदरच्या कोणत्या ही चित्रपटामधून किती प्रमाणात खरा इतिहास समाजाला दाखविण्याचा प्रयत्न केला जातो? कोणत्या ही चित्रपटामधून चित्रपट निर्माता प्रेक्षकांच्या नेमक्या भावनांवर बोट ठेवून चित्रपटांची निर्मिती करत असतो. त्यामुळे आपण भावनांच्या आहारी जाऊन सहसा कोणती ही समीक्षा न करता चित्रीकरणातील इतिहास पुढील पिढीच्या मनावर बिंबवत असतो. यामुळे आपण आपल्या पाल्याला पुस्तकातील संशोधनात्मक इतिहास शिकविला पाहिजे. तरच आपण समाजात महापुरुषांचा खरा विचार आणि खरे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवू शकतो. अशा प्रकारचे विचार यावेळी कांबळे यांनी मांडले.

यानंतर शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी छत्रपती चौकातील महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी उपस्थिती लावली होती. त्याचप्रमाणे शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर कांबळे यांनी कौतुकाची थाप टाकली.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे