स्नेहबंध’तर्फे गरजू बालकांना शर्टचे वाटप

‘स्नेहबंध’तर्फे गरजू बालकांना शर्टचे वाटप
डॉ. उद्धव शिंदे यांच्या संकल्पनेतून सावेडी झोपडपट्टीतील मुलांना मदतीचा हात; समाजाने वंचितांच्या शिक्षण व सन्मानासाठी पुढे यावे, असे आवाहन
अहिल्यानगर : स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या संकल्पनेतून सावेडी येथील झोपडपट्टी परिसरातील गरीब व गरजू मुलांसाठी शर्टचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी इंजिनियर अभिजीत ढाकणे, मिलिंद कानडे, आयुष लालबोन्द्रे, स्वयंम बास्कर व प्रथमेश राठोड उपस्थित होते. यावेळी मुलांना शर्टचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, “समाजातील प्रत्येक मुलाला सन्मानाने जगण्याचा आणि शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. गरजू मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे, त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे आणि समाजाने अशा मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून प्रत्येकाने आपल्या परीने अशा उपक्रमांमध्ये सहभाग घेतला, तर समाज अधिक संवेदनशील आणि सक्षम बनेल.”
या उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, उपस्थितांनी स्नेहबंध फौंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.


