क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी आपल्या जीवनातला अज्ञानाचा अंधकार दूर केला- नंदिनी काकी वाबळे
क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी आपल्या जीवनातला अज्ञानाचा अंधकार दूर केला- नंदिनी काकी वाबळे
श्रीगोंदा / प्रतिनिधी : आदेश उबाळे
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात दिनांक ३ जाने २०२५ ( वार – शुक्रवार ) रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन स्थानिक स्कूल कमिटी च्या सदस्या नंदिनी काकी वाबळे, सामाजिक कार्यकर्त्या नयनाताई शिंदे, विद्यालयाचे मुख्याध्यापक हौसराव दांगडे, पर्यवेक्षक विलास भाऊ सुलाखे व सर्व सेवकांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर विद्यालयातील रिद्धी चाकणे, फातिमा इनामदार, वेदिका भगत, प्रज्ञा उंडे , साई आवारे या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विलास भाऊ सुलाखे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदिनी काकी वाबळे या बोलताना म्हणाल्या क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी आपल्या जीवनातला अज्ञानाचा अंधकार दूर केला. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी सोनाली ताई वाबळे याही आवर्जून उपस्थित होत्या
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्तिकी सोमवंशी हिने केले तर प्रीती विघ्ने या विद्यार्थिनीने सर्वांचे आभार मानले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.