Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी भाग्यश्री जोशीची निवड; ‘भिंगार स्पोर्ट्स क्लब’चा गौरव

हैदराबाद येथे राष्ट्रीय स्तरावर खेळणार; डॉ. उद्धव शिंदे यांच्या हस्ते मेडल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान

0 8 9 6 7 5

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी भाग्यश्री जोशीची निवड; ‘भिंगार स्पोर्ट्स क्लब’चा गौरव

हैदराबाद येथे राष्ट्रीय स्तरावर खेळणार; डॉ. उद्धव शिंदे यांच्या हस्ते मेडल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान

 

अहिल्यानगर : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत भिंगार येथील भिंगार स्पोर्ट्स क्लब (सबका क्लब) ची विद्यार्थिनी कु. भाग्यश्री प्रशांत जोशी हिने पारनेर येथे झालेल्या निवड चाचणीतून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. आता ती हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार असून, तिच्या या यशामुळे भिंगारच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
भाग्यश्री ही छावणी परिषद संचलित पीएमश्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक शाळेत इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत आहे. तिने ६० मीटर धावणे, ६०० मीटर धावणे, लांब उडी आणि भालाफेक अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये सराव व तयारी केली आहे. भिंगार स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक मेजर विठ्ठल काळे आणि राष्ट्रीय खेळाडू शंकर औरंगे यांनी तिला मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे भाग्यश्रीला राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली आहे.
भाग्यश्रीच्या या यशाबद्दल स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या हस्ते तिला मेडल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी तिच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे, भिंगार स्पोर्ट्स क्लबचे आणि अहिल्यानगरचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना योग्य प्रशिक्षण आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारू शकतात, याचे भाग्यश्री जोशी हे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

 

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे