बालाजी वैद्य यांची अहिल्यानगर शहराच्या पोलीस निरीक्षक पदी निवड
श्री देवांग कोष्टी पंच मंडळाच्या वतीने सत्कार संपन्न
बालाजी वैद्य यांची अहिल्यानगर शहराच्या पोलीस निरीक्षक पदी निवड
श्री देवांग कोष्टी पंच मंडळाच्या वतीने सत्कार संपन्न …
एस डब्ल्यु न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : देवांग कोष्टी समाजाचे भूषण देऊळगाव राजा चे सुपुत्र श्री बालाजी वैद्य यांची अहिल्यानगर शहराच्या पोलीस निरीक्षक पदी निवड झाल्या बद्दल नालेगाव भागातील कुंभारगल्ली येथील श्री देवांग कोष्टी पंच मंडळाच्या वतीने पो. नि . बालाजी वैद्य यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला .
नवनियुक्त पो . नि . बालाजी वैद्य यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नवीन जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा आणि समाजाप्रती कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला.
या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष प्रफुल्ल लाटणे, उपाध्यक्ष रुपेश मुकोटे,सचिव अशोक फलके, खजिनदार उमेश टेके,ट्रस्टी सागर दळवे, संतोष टेके, बाळासाहेब मुकोटे, विजय खटावकर, शुभम तारळकर, दिनेश लाटणे आणि मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक गोवर्धन देखणे सर उपस्थित होते . मंडळाच्या वतीने श्री .वैद्य यांचे नियुक्ती बद्दल अभिनंदन करण्यात आले .
.


