६० दिवसांत कांदा उत्पादनाचा दावा; टाकळीभान येथे १ सप्टेंबरला प्रात्यक्षिक

६० दिवसांत कांदा उत्पादनाचा दावा; टाकळीभान येथे १ सप्टेंबरला प्रात्यक्षिक
नामदेव येवले यांच्या शेतातील प्रयोगाची चर्चा; कृषी तज्ज्ञांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
राहुरी तालुका / जावेद शेख
पारंपरिक पद्धतीने कांदा उत्पादनासाठी लागणारा वेळ, वाढता उत्पादन खर्च आणि पाण्याची उपलब्धता या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर टाकळीभान (ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) येथील शेतकरी नामदेव येवले यांच्या शेतातील कांदा उत्पादनाचा प्रयोग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अवघ्या ६० दिवसांत कांदा तयार केल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रयोगाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता टाकळीभान स्थळः नामदेव येवले शेत, टाकळीभान, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आले आहे.स्थळः नामदेव येवले शेत, टाकळीभान, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर आदिदिशा सीड्स प्रा. लि. यांच्या तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रयोग करण्यात आल्याची माहिती कंपनीचे कार्यकारी अधिकारी अंकुश दादा सोळंके यांनी दिली. कमी कालावधीत तसेच तुलनेने कमी पाण्याच्या वापरातून कांदा उत्पादन घेण्याच्या दृष्टीने या पद्धतीकडे पाहिले जात आहे. कांदा लागवड, पीक व्यवस्थापन, आवश्यक तांत्रिक बाबी आणि उत्पादन प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष माहिती देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला अध्यक्ष मा. केदा नाना आहेर संचालक NAFED महाराष्ट्र राज्य, कृषिभूषण सुरशिंग पवार, कृषिभूषण विष्णू जरे, कृषिभूषण रवींद्र चव्हाण, अध्यक्ष डॉ.आनंद सोळंके,माजी प्रमुख शास्त्रज्ञ, बियाणे व कृषीविद्या, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहिल्यानगर, प्रमुख, उद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉ.बी.टी.पाटील, प्रमुख , उद्यान विद्या विभाग, उंडे ऍग्रो श्रीरामपूरचे श्री राहुल उंडे पाटील ,कृषीभूषण विष्णू जरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश दादा सोळंके, आदिदिशा सीड्स,कांदा तज्ञ प्रवीण मेधने, डॉ बाबा गोरे, कृषीभूषण सुरसिंग पवार, कृषीभूषण रवींद्र चव्हाण यांच्यासह कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
६० दिवसांत २०० क्विंटल उत्पादनाचा दावा शेतकरी श्री
नामदेव येवले यांच्या माहितीनुसार, त्यांच्या शेतात या पद्धतीने सुमारे ६० दिवसांत २०० क्विंटल कांदा उत्पादन झाले. उत्पादित कांद्याला प्रतिकिलो ४० रुपये दर मिळाल्याने सुमारे ८ लाख रुपयांचे उत्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रयोगाशी संबंधित लागवड व उत्पादनाची लेखी माहिती जतन करून ठेवण्यात आल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. मात्र, या उत्पादनाचा कालावधी, प्रत्यक्ष उत्पादन, खर्च, बाजारभाव आणि निव्वळ नफा याबाबतची सविस्तर माहिती कार्यक्रमाच्या वेळी तज्ज्ञांच्या उपस्थितीत मांडण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या प्रयोगाचे प्रत्यक्ष आर्थिक गणित समजून घेता येणार आहे.
कृषी तज्ज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन
या प्रात्यक्षिक कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विविध भागांतील शेतकरी तसेच कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील तज्ज्ञांकडून कांदा उत्पादनाच्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी कांदा लागवडीची पद्धत, पीक व्यवस्थापन, पाणी नियोजन, कमी कालावधीत उत्पादन घेण्याच्या तंत्रज्ञानासह उत्पादन खर्च आणि बाजारपेठेच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींवर चर्चा होणार आहे. शेतकऱ्यांना थेट शेतावर पिकाची पाहणी करून तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता
कांदा हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पिकांपैकी एक असून, उत्पादन खर्च, पाण्याची उपलब्धता, पीक कालावधी आणि बाजारभाव या सर्व बाबी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे कमी कालावधीत आणि कमी पाण्यात कांदा उत्पादन घेण्याच्या तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.टाकळीभान येथील या प्रयोगाच्या पार्श्वभूमीवर १ सप्टेंबर रोजी होणारे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. या वेळी प्रत्यक्ष पिकाची पाहणी, लागवडीपासून उत्पादनापर्यंतची प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाची उपयुक्तता याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे.कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी नामदेव येवले व आदिदिशा सीड्स प्रा. लि. यांच्या वतीने करण्यात आले आहे.


