Breaking
ब्रेकिंग

गुंडेगाव येथील कोतकर मळ्यात गणपती उत्सव आनंदात संपन्न…

तिरंगा गणपती उत्सव समिती तसेच नागरिक महिला यांच्या सहभागाने दहा दिवसांचा सोहळा लक्षवेधी..*

0 7 6 9 3 7

 

गुंडेगाव येथील कोतकर मळ्यात गणपती उत्सव आनंदात संपन्न…

*तिरंगा गणपती उत्सव समिती तसेच नागरिक महिला यांच्या सहभागाने दहा दिवसांचा सोहळा लक्षवेधी..*

प्रतिनिधी : दादासाहेब आगळे

अहिल्या नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील तिरंगा गणपती मंडळ,कोतकर मळा यांनी गणपती उत्सव निमित्त दहा दिवसांपासून सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रमांचे ज्यात पारंपरिक नृत्य, गायन,संगीत खुर्ची,फुगडी, दररोज महाप्रसादाचे आयोजन करुन कौटुंबिक सलोखा तसेच कौटुंबिक दिवसभरातून शेती व्यवसायातून थकलेल्या पुरुष, महिला भगिनींचा सायंकाळी आनंद सोहळ्याचा उत्सव या ठिकाणी पाहायला मिळाला.या उत्सावाला स्थानिक तसेच बाहेरील नागरिकांची मोठी उपस्थिती असते.
गणपती उत्सव (गणेशोत्सव) भारतातील एक अत्यंत लोकप्रिय धार्मिक आणि सांस्कृतिक सण आहे जो विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि सार्वजनिक स्तरावर साजरा केला जातो.गेल्या २५ वर्षापासुन हा सोहळा गुंडेगाव येथील तिरंगा गणपती उत्सव समिती ने मोठ्या उत्साहात साजरा केला यंदा या उत्सवाचे २६ वे वर्ष असून या सोहळ्याला दररोज महाप्रसाद विविध सांस्कृतिक कार्यक्रम चुल बंद आमंत्रण आयोजित करण्यात आले होते.
या मळ्यातील विविध कुटुंबाला आरतीचा मान देण्यात आला होता‌ यामध्ये सदर कुटुंबांनी महाप्रसाद देऊन योगदान दिले तसेच इतर कुटुंबीयांनी देखील या सोहळ्याला योगदान दिले आहे.
या वेळी मंडळाचे अध्यक्ष नवनाथ कोतकर, उपाध्यक्ष राहुल कोतकर,सुयोग कोतकर,गोरख कोतकर, संतोष कोतकर,अशोक कोतकर,लक्ष्मीकांत हराळ, सुयोग कोतकर, राजेंद्र कोतकर, दत्ता कोतकर,रवि कोतकर, ज्ञानदेव कोतकर,बालू कोतकर,किरण हराळ,सुजय जाधव, श्रीकांत जाधव,सचिन काळे, तुकाराम काळे,विशाल कोतकर, ईश्वर हराळ, रमेश कोतकर यांनी परिश्रम घेतले तसेच माजी सरपंच हरिश्चंद्र कोतकर, गंगाराम कोतकर,रोहीणी कोतकर, संजना कोतकर,नेहा कोतकर,सविता कोतकर,माया शिवनाथ कोतकर,सुनिता कोतकर,साक्षी कोतकर,निर्मला कोतकर, अर्चना संभाजी कोतकर,सविता कोतकर, द्वारकामाई कोतकर,शिवानी कोतकर,सई कोतकर,शारदा काळे, प्रिया काळे, ताराबाई कोतकर,कोमल कोतकर, पल्लवी कोतकर,पायल कोतकर,कोमल कोतकर आदी महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रम आनंदात साजरा करत होते..

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे