धंगेकर चेस अकॅडमी, आयोजित जी. एस. रायसोनी मेमोरियल भव्य रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा अहिल्यानगर येथे संपन्न
धंगेकर चेस अकॅडमी, आयोजित जी. एस. रायसोनी मेमोरियल भव्य रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा अहिल्यानगर येथे संपन्न
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
नगर: रविवार दि. २८/१२/२५ रोजी सुयोग मंगल कार्यालय, कोर्ट गल्ली, नगर येथे धंगेकर चेस अकॅडमी व अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने भव्य रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन पटावर चाल देऊन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद चे सहसंचालक श्री. रमाकांत काटमोरे साहेब (पुणे) व धंगेकर चेस अकॅडमीचे श्री. प्रशांत धंगेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या स्पर्धेत ५ वर्षा पासून ते ८३ वर्षा पर्यंत जेष्ठ बुद्धिबळ खेळाडूंचा सहभाग होता. स्पर्धेत एकूण १८८ खेळाडूंनी सहभाग घेतला त्यात ४२ आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू होते.
उद्घाटन पर भाषणात श्री. रमाकांत काटमोरे साहेब यांनी पालक खेळाडू व उपस्थितांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. बुद्धिबळ खेळामुळे मनाची एकाग्रता वाढवून आपल्याला कामात अभ्यासात मदत होते खेळाडूंनी बुद्धिबळ खेळाचा सराव वाढवून या स्पर्धेत कौशल्य पणाला लावून खेळावे. बुद्धिबळा मुळे बुद्धीचा विकास होतो, मन स्थिर राहते पालकांनी आपल्या पाल्याच्या खेळासाठी सराव करून घ्यावा. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाबरोबर खेळासाठी वेळ देणे आवश्यक आहे. अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ खेळाडूंसाठी वेळोवेळी स्पर्धेचे आयोजन करत आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो.
स्पर्धेचे प्रास्ताविक बुद्धिबळ संघटनेचे सचिव श्री यशवंत बापट सर यांनी केले त्यांनी रायसोनी फाउंडेशन व कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन यांना या स्पर्धेत सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद दिले.
या स्पर्धेत पंच म्हणून प्रशांत धंगेकर, देवेंद्र ढोकळे, प्रकाश गुजराथी, राहुल जरे, सचिन कांबळे, रोहिणी आडकर, अनुराधा बापट यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सायंकाळी आठ वाजता ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक श्री प्रकाश गुजराती सर, सचिन कांबळे, अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव श्री यशवंत बापट तसेच धंगेकर चेस अकॅडमी चे श्री. प्रशांत धंगेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. सर्व विजेत्यांना रोख बक्षिसे प्रमाणपत्र व करंडक देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सर्व सदस्य, सुनील जोशी, दत्ता घाडगे, चेतन कड यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन श्री. पारुनाथ ढोकळे यांनी केले तर आभार श्री. प्रशांत धंगेकर यांनी मानले. यावेळेस सुयोग मंगल कार्यालय हे बुद्धिबळ खेळाडूंनी व पालकांनी तुडुंब भरले होते.



