Breaking
ब्रेकिंग

सोलापूर जिल्हा होमगार्ड त्रैमासिक संमेलन खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न..

होमगार्डच्या अडीअडचणीचे केले निरसण

0 8 6 5 3 0

सोलापूर जिल्हा होमगार्ड त्रैमासिक संमेलन खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न..

होमगार्डच्या अडीअडचणीचे केले निरसण

करमाळा / विशेष प्रतिनिधी :  सचिन जव्हेरी

महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासमादेशकांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा होमगार्ड यांचे आज त्रैमासिक संमेलन शेकडो पुरूष व महीला होमगार्ड यांचे उपस्थितीत आज सोलापूर येथील संवाद हाॅल येथे मोठ्या आनंदात व उत्साहात संपन्न होत होमगार्ड यांना बंदोबस्त काळात येणाऱ्या अडिअडचणी सोडवून संपन्न झाला.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तथा सोलापूर जिल्हा होमगार्डचे समादेशक प्रितम यावलकर,होमगार्डचे जिल्हा केंद्रनायक मळसिद्ध कोकरे,प्रशासकीय अधिकारी श्री. माळी,होमगार्ड जिल्हा कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक सुनिल चव्हाण हे यावेळी उपस्थित होते.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांनी जिल्ह्य़ातील पुरूष व महिला यांचे अडिअडचण ऐकुण घेऊन त्यांचे अडचणीचे निवारण करून सोलापूर जिल्हा होमगार्ड यांचे काम खुप छान असुन प्रसंगानुरूप आजपर्यंत यशस्वी निर्णय घेत काम करतात ही खुप छान काम असल्याचा उल्लेख करत जिल्ह्य़ातील होमगार्ड यांचे कामाचे कौतुक व अभिनंदन केले. यापुढेही
होमगार्ड यांनी अशीच कामगीरी करून होमगार्ड संघटनेचे नाव रोशन करावे अशी अपेक्षा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी सोलापूर शहराचे समादेशक अधिकारी श्री. इंगळे,करमाळा होमगार्ड तालुका समादेशक अधिकारी सचिन जव्हेरी,पंढरपूरचे सुरेश पवार, शामराव परचंडे, वैरागचे किशोर भोसले,कुर्डुवाडीचे संकेत पाठक,माढ्याचे गणेश चवरे,अकलुजचे सुनिल सुळ, श्री. वांजळे,नातेपुतेचे श्री.गावडे,माळशिरसचे श्री. थोरात,मोहोळचे नानासाहेब वाघमोडे,मंद्रुपचे श्री.कुंभार,अक्कलकोटचे श्री. स्वामी बार्शीचे जालिंदर देवकर,मंगळवेढ्याचे श्री.गरड,वरिष्ठ पलटन नायक संतोष कुंभार यांसह जिल्ह्य़ातील सर्व तालुका होमगार्ड पथकाचे अधिकारी व पुरूष महीला होमगार्ड बहुसंख्येने हजर होते.

यावेळी होमगार्ड यांना मार्गदर्शन करताना केंद्रनायक मळसिद्ध कोकरे यांनी होमगार्ड संघटनेचे कार्यपद्धती उपस्थित होमगार्ड यांना सांगुन सर्व होमगार्ड यांनी होमगार्ड संघटनेचे ध्येयधोरण,नियम व शिस्तीचे पालन करणे यावर मार्गदर्शन करून होमगार्ड यांनी मांडलेल्या अडचणींवर स्पष्टीकरण करून होमगार्ड यांचे समाधान केले.व होमगार्ड गणवेशा संदर्भात माहीती देवून नेमके कसे कर्तव्य बजावयचे याची माहीती देत सर्वांनी एकविचाराने काम करून समादेशक अधिकारी व लिपिक यांनी पथकातील होमगार्ड यांचेकडून शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याचे सांगितले.

या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी श्री. माळी यांनीही होमगार्डच्या कामकाजाबद्दल व कार्यालयीन पद्धतीबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले व प्रशासकीय मदत जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे त्या त्या पथकास मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे