*”सावित्रीबाई फुले विद्यालयात अमली पदार्थ विरोधी दिन व छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी”*

“सावित्रीबाई फुले विद्यालयात अमली पदार्थ विरोधी दिन व छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी”*
राहुरी तालुका जावेद शेख
सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अमली पदार्थ विरोधी दिन आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज यांची जयंतीउत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राहुरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री. संजय ठेंगे उपस्थित होते.
अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अमली पदार्थ म्हणजे काय व त्याचे होणारे परिणाम याबाबत जनजागृती करण्याची गरज भासण्याचे कारण मोठ्या शहरातील अनेक विद्यार्थी शालेय जीवनातच व्यसनाधीन झाले आहेत तसेच मित्राच्या संगतीने अनेक जण ह्या जाळ्यामध्ये अडकत आहेत वव्यसनाधीन युवक गुन्हेगारीकडे वळत आहेत तरी या सर्वांचे दुष्परिणाम जीवनास वकुटुंबास हानिकारक आहेत तसेच अमली पदार्थ इतकेच मोबाईलचे व्यसनही घातक आहे यापासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे , एवढेच नव्हे, तर पालकांमध्येअसणारे व्यसन आपल्या प्रेमाने सोडायला लावावे
“आज ई-सिगारेट, विविध पेये अशा नव्या स्वरूपात व्यसनांचे प्रकार समोर येत आहेत, जे युवकांना आकर्षित करत आहेत. परिणामी अनेक कुटुंबे उध्वस्त होत कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अरुण तुपविहिरे होते. त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याकरिता सर्व विद्यार्थ्यांनी धर्मनिरपेक्ष व विवेक वादी व वैज्ञानिक दृष्टिकोन गुण आचरणात आणावे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या विद्यार्थी कार्तिकी सोनवणे तर आभार प्रदर्शन वाल्मिक कुलकर्णी याने केले. या प्रसंगीउपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा, रवी हरिश्चंद्रे, संदीप कुंभारे,तुकाराम जाधव, हलीम शेख, अनघा सासवडकर, सुरेखा आढाव,सचिन सिन्नरकर,बाबासाहेब शेलार ,अनघा सासवडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागृती निर्माण केली असून, व्यसनमुक्ती आणि सामाजिक समतेचे महत्त्व अधोरेखित केले.