. . . या ऐतिहासिक घोषणेबद्दल वड चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारका समोर जल्लोष
छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ गड–किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट
. . . या ऐतिहासिक घोषणेबद्दल वड चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारका समोर जल्लोष
छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ गड–किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- भारतीय जनता पार्टी अमळनेर शहर यांच्या वतीने या ऐतिहासिक घोषणेबद्दल वड चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास मळ्यार्पण करून फटाके फोडले व जल्लोष करून उत्सव साजरा करण्यात आला.
त्या वेळी भाजपा तालुका अध्यक्ष जानवे मंडल जिजाब नाना भाजपा शहराध्यक्ष योगेश महाजन महेश पाटील श्याम पाटील संदीप पाटील दिलीप ठाकूर सुभाष मामा दिलीप साडी भरत सिंह परदेशी रमेश देव धनगर तुळशीराम हटकर मनोज बारी युवा मोर्चा शहराध्यक्ष देविदास लांडगे समाधान पाटील गौरव सोनार सागर शेटे रवी ठाकूर शिवम पवार मनोज पवार दीपेश महाजन परिसरातील भाजपचे ज्येष्ठ नागरिक व नागरिक सुरेश सोनवणे सुधाकर महाजन रामदास बडगुजर पांडुरंग बारी रंजीत नाना अशोक शिंदे सुरेश शेटे गुरुदास पाटील गणेश सोनवणे अनिल ठाकूर आधी उपस्थित होते.
जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले जाणारे हे १२ किल्ले म्हणजे मराठ्यांच्या पराक्रमाची, स्वराज्य स्थापनेची व शौर्यगाथेची प्रतीकं आहेत.हे यश फक्त महाराष्ट्राचे नव्हे, तर प्रत्येक भारतीयाचे अभिमानाचे आहे.
ही ओळख जागतिक स्तरावर शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेला मिळालेली मान्यता आहे.महाराष्ट्र शासनाचा शिवरायांना मानाचा मुजरा युनेस्कोने ज्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली.
ते किल्ले पुढीलप्रमाणे : १२ गौरवशाली किल्ले:1️⃣ शिवनेरी – जन्मभूमी, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण घडले2️⃣ राजगड – स्वराज्याची पहिली राजधानी3️⃣ रायगड – राज्याभिषेक स्थळ आणि स्वराज्याची शाश्वत राजधानी4️⃣ प्रतापगड – अफझलखान वधाचा ऐतिहासिक पुरावा5️⃣ पहाळा – गिरिदुर्ग रक्षणाचे महत्व6️⃣ साल्हेर – मुघलांवर ऐतिहासिक विजय7️⃣ लोहगड – मजबूत आणि देखणा किल्ला8️⃣ खांदेरी – समुद्री संरक्षणाचे प्रतीक 9️⃣ सुवर्णदुर्ग – सागरी सामर्थ्याचे महत्त्व🔟 विजयदुर्ग – अजेय सागरी किल्ला1️⃣1️⃣ सिंधुदुर्ग – छत्रपतींचा नौदल दृष्टीकोन1️⃣2️⃣ जिंजी (तामिळनाडू) – दक्षिण भारतातील शिवरायांचा भक्कम ठसा .महाराष्ट्रातील जनतेचे आणि सर्व शिवप्रेमींचे मनःपूर्वक अभिनंदन. जय शिवराय! जय महाराष्ट्र! जय हिंद!


