ब्रेकिंग
गणरायाच्या चरणी सुख-समृद्धीसाठी प्रार्थना महापौर सौ. ज्योतीताई गाडे यांच्या हस्ते आरती; स्नेहबंध सोशल फौंडेशनतर्फे गणेशोत्सव

0
8
9
6
7
4
गणरायाच्या चरणी सुख-समृद्धीसाठी प्रार्थना महापौर सौ. ज्योतीताई गाडे यांच्या हस्ते आरती;
स्नेहबंध सोशल फौंडेशनतर्फे गणेशोत्सव
अहिल्यानगर : स्नेहबंध सोशल फौंडेशन / पियुष डिजिटल, अहिल्यानगर कार्यालयात श्री गणरायाचा भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त श्री गणरायाला आकर्षक पोशाख परिधान करून सुंदर सजावट करण्यात आली होती.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर सौ. ज्योतीताई अमोल गाडे यांच्या हस्ते श्री गणरायाची भक्तिभावाने आरती करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी गणरायाचे दर्शन घेत सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य व यशासाठी प्रार्थना केली.
यावेळी स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, सौ. सुशीला शिंदे, इंजि. अभिजीत ढाकणे, बाबासाहेब बेरड, निशांत पानसरे, आकाश शिंदे, संकेत शेलार तसेच मित्र परिवार उपस्थित होता.
0
8
9
6
7
4


