पत्रकार व त्यांच्या कार्याला पाठिंबा देणे काळाची गरज :- दिपक पाटील*

*पत्रकार व त्यांच्या कार्याला पाठिंबा देणे काळाची गरज :- दिपक पाटील*
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- आज ३ मे पत्रकार स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील वाघोदे यांनी जळगाव जिल्हा उप संपादक पंकज पाटील यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या पत्रकार बांधव आहेत म्हणून संघर्ष करणारा व्यक्ती हा समाज माध्यमाच्या नजरेत आणून देण्याच काम आपण करत असतातच परंतु असत्याचा नाश व्हावा यासाठी दिवस रात्र परीश्रम करणारा पत्रकार हे पंकज पाटील यांच्या सारखं उत्तम उदाहरण ठरणारा व्यक्ती असावा नेहमीच स्टुडंट्स असोसिएशन अनेक मुद्यांवर चर्चा घेऊन येत असते परंतु राजकीय पक्ष श्रेष्ठी च्या दबावाखाली न चालणारे पत्रकार बांधव म्हणून आम्ही जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात नाव काढतो अस दिपक पाटील यांनी भावनिक शब्दात पंकज पाटील यांची गुणवत्ता वाढवली नेहमीच आम्ही पहात असतो कोणती बातमी ही शेतकरी बापासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी श्रेष्ठ ठरेल यासाठी ते काम करतात आम्ही पैसे कमावणारे खुप पहात आलो पण जनते साठी खिशातून पैसा काढणारे पत्रकार पंकज पाटील यांना आम्ही पाहिले नक्कीच त्यांच्या कार्याला मी महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील वाघोदे ता. अमळनेर त्यांच्या कार्याला तसेच त्यांना सलाम करतो असे दिपक पाटील यांनी जळगाव जिल्हा उप संपादक पंकज पाटील यांच्या बद्दल भावनिक शब्दात गुणवत्ता वाढवली.आमचे दादा साहेब पंकज पाटील यांच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर शब्द देखील अपूर्ण पडतील एवढी कामगिरी ते श्रेष्ठ करण्यासाठी ते काम करतात असं देखील दिपक पाटील म्हणाले.