उन्हापासून संरक्षण होण्यासाठी नागरिकांना टोप्या वाटप ; स्नेहबंध सोशल फौंडेशनचा उपक्रम

उन्हापासून संरक्षण होण्यासाठी नागरिकांना टोप्या वाटप ; स्नेहबंध सोशल फौंडेशनचा उपक्रम
एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर – उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर टोपी आवश्यक असते. भरदुपारी कडाक्याच्या उन्हात बाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. या पार्श्वभूमीवर उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने गरीब नागरिकांना टोप्या वाटप केल्या. स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम अहिल्या नगर शहरातील विविध भागांमध्ये राबवण्यात आला. निशांत पानसरे, अमोल बास्कर, प्रतिक डहाळे, स्वयंम बास्कर
या वेळी उपस्थित होते.
दुपारच्या वेळी कामासाठी बाहेर पडू नका : डॉ. उद्धव शिंदे
उन्हापासून बचाव होण्यासाठी प्रत्येकाने टोपी वापरावी शक्य असल्यास दुपारच्या वेळी कामासाठी बाहेर पडू नये, तसेच सकाळी किंवा संध्याकाळी उशिरा कामांची विभागणी केली जावी व अगदीच आवश्यक काम असेल तर उन्हात बाहेर पडताना टोपीचा वापर करावा, असे स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सांगितले.



