लोणथाळ, ससे टेकडी, बुद्धिवंत परिसरात दलितवस्ती सुधार योजनेतून स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामाचा शुभारंभ व काम ही पुर्णत्वास.

लोणथाळ, ससे टेकडी, बुद्धिवंत परिसरात दलितवस्ती सुधार योजनेतून स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामाचा शुभारंभ व काम ही पुर्णत्वास…
गुंडेगाव /प्रतिनिधी : संजय भापकर
गुंडेगाव (अहिल्यानगर) येथील हराळमळा लोणथाळ , बुद्धिवंत वस्ती, भापकर वस्ती तसेच ससेटेकडी परिसरात अखेर प्रकाशमान वातावरण निर्माण झाले आहे. *दलितवस्ती सुधार योजना निधी अंतर्गत रु. ५,५९,०००/- खर्चून अत्याधुनिक स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या कामासाठी संरपच सौ. मंगलताई सकट, उपसरपंच नानासाहेब हराळ, तत्कालीन उपसरपंच संतोष भापकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील भापकर, कुसुमताई हराळ, संजय कोतकर, साधना चौधरी, अश्विनी चौधरी, जयश्री कुताळ, संतोष धावडे* यांनी एकमताने मंजुरी देत तातडीने गावातील अनेक ठिकाणी दलितवस्ती सुधार योजनांच्या कामाला सुरुवात केली. यामुळे लोणथाळ परिसरात सुरक्षिततेत वाढ होणार असून, नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीची पूर्तता झाली आहे.
या स्ट्रीट लाईटच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी संरपच मंगलताई सकट, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, उपसरपंच नानासाहेब हराळ, ग्रामपंचायत सदस्य सुनील भापकर, भाऊसाहेब हराळ, प्रा. रंगनाथ भापकर, इजि. बाळासाहेब भापकर, किसन बुद्धिवंत, संतोष जावळे, उत्तम भापकर, अरुण जावळे, संदिप भापकर,रामकृष्ण कुताळ, सागर जावळे, दत्तात्रय भापकर, सुभाष भापकर, तुकाराम भापकर,नागेश भापकर, श्यामराव भापकर, मेजर बाळासाहेब भापकर, गणेश भापकर आदी परीसरातील ग्रांमस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नव्याने निर्माण झालेल्या लोणथाळ ससेटेकडी,भापकर वस्ती, बुद्धिवंत वस्ती परीसरातील विकासकामांसाठी वेळोवेळी विद्यामान ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच सुनील भापकर, भाऊसाहेब हराळ, सतिश चौधरी (काका ) तसेच पत्रकार संजय भापकर यांनी सातत्याने पाठपुरावा करत ग्रामसभेत मागणी केली होती. यावेळी स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत “ गावातील सर्वच वाडी वस्तीवर अंधाराऐवजी उजेडाचा नवा पर्व सुरू झाला पाहिजे” अशा शब्दांत समाधान व्यक्त केले आहे.
या लोणथाळ परिसरातील वस्ती भाग अधिक सुरक्षित, स्वच्छ व सुसज्ज होण्यास मदत होणार आहे….
” या दलितवस्ती सुधार योजनांची स्ट्रीट लाईट इतर ठिकाणी बसवण्याचा घाट घातला होता पण ग्रामस्थांच्या पाठबळामुळे व प्रशासकीय अधिकारी यांना धारेवर धरल्यानंतर अखेर बुद्धिवंत वस्ती लोणथाळ ससेटेकडी भापकर वस्ती दिवाळीच्या पुर्वसंध्येलाच प्रकाशमय झाली “.
— संजय भापकर, गुंडेगाव.


