Breaking
ब्रेकिंग

संदीप वारगे राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित, नाशिक येथे गौरव

0 3 9 0 7 0

संदीप वारगे राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित, नाशिक येथे गौरव

अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे

पत्रकारिता, सामाजिक कार्य, वैद्यकीय व शैक्षणिक कार्य या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेता दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक यांच्या वतीने आज दिनांक ५जानेवारी रोजी नाशिक येथील ओरिझोन अकादमी येथे त्यांना विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय उपग्रह मोहिमेमध्ये सहभाग घेण्यास मार्गदर्शन करणे व त्यांना विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणे, याकरिता रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हटाळे, तालुका अलिबाग येथील रायगड जिल्हा व महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षक श्री संदीप दत्तात्रेय वारगे यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक यांच्या वतीने राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले .

सलग दोन उपग्रह मोहिमामध्ये सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान व उपग्रह आणि अवकाश संशोधन याबाबत मार्गदर्शन करणाऱ्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन रामेश्वरम यांनी अनुक्रमे 100 व 150 उपग्रह निर्मिती / प्रक्षेपण मोहिमा राबविल्या. यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील तीन विद्यार्थी व इतर संस्थांमधील 17असे एकूण 20 विद्यार्थ्यांना श्री संदीप दत्तात्रय वारगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या पुरस्कार कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिकचे अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे, गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर भारती चव्हाण, संचालक राजेशजी उपासनी, मॉडेल व मिसेस मलेशिया इंटरनॅशनल डॉक्टर ज्योती केदारे शिंदे, दैनिक सामनाचे मुख्य संपादक मनोज शिंदे, रोटरी क्लबचे अध्यक्ष ओम प्रकाशजी रावत, भाजप प्रवक्ते अभिजीत चव्हाण आदींची उपस्थिती होती.

[[ प्राथमिक शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करून कोरोना कालावधीमध्ये “शाबास गुरुजी” ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून दहा हजार शिक्षकांना व्हिडिओ निर्मिती प्रशिक्षण तसेच राज्यस्तरावर मूलभूत गणित संबोधाचे मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. व जिल्हास्तरावर विज्ञान व तंत्रज्ञानाचा जादूगार अशी सरांची ओळख दिली जाते.]]
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे