Breaking
ब्रेकिंग

सतखेडा येथील प्रगतिशील शेतकऱ्याचा  मका बियाण्याच्या सहाय्याने आपल्या शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग भरीव उत्पादन यशस्वी प्रयोग 

0 3 9 0 4 0

सतखेडा येथील प्रगतिशील शेतकऱ्याचा  मका बियाण्याच्या सहाय्याने आपल्या शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग भरीव उत्पादन यशस्वी प्रयोग 

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

धरणगाव :- धरणगाव  तालुक्यातील सतखेडा येथील प्रगतिशील शेतकरी कैलास दिलीप पाटील यांनी महिंद्रा ४०६६ मका बियाण्याच्या सहाय्याने आपल्या शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग भरीव उत्पादन घेतले आहे. महिंद्रा ४०६६ मका बियाण्याचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे घट्ट आणि दाणेदार कणसं, उच्च प्रतिकारशक्ती, तसेच उत्कृष्ट उत्पादन क्षमता. या बियाण्याच्या वापरामुळे कैलास पाटील यांनी अल्पावधीत भरघोस उत्पादन घेतले आहे. या यशस्वी प्रयोगाच्या निमित्ताने त्यांच्या शेतात एक विशेष शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला या ठिकाणी आधुनिक शेतीवर व शेतकरी कर्जमाफी वर आणि प्रत्यक्ष पीक पाहून माहिती घेतली/चर्चा केली. सदर वरील बियाणे उत्तम उत्पादन क्षमता देणारे असल्याने मजबूत रोपे आणि चांगली वाढ तसेच उष्णता आणि तणाव सहन करण्याची क्षमता घट्ट व जास्त वजनदार कणसं असल्याने भरीव उपन्नात वाढ होत असल्याची माहीती मेळाव्यात देण्यात आली. कैलास पाटील यांच्या पुढाकाराने आदर्श शेतकरी गटाच्या माध्यमातून आधुनिक शेती पद्धतींचा प्रचार व प्रसार केला जात आहे. त्यांचे हे कार्य इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना व्यक्त करण्यात आल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे