वाहतुक पोलीस सुरक्षेसाठी असून वाद न घालता त्यांना सहकार्य करावे – पो . नि . बाबासाहेब बोरसे
वाहतुक पोलीसांशी वाद घालणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल
वाहतुक पोलीस सुरक्षेसाठी असून वाद न घालता त्यांना सहकार्य करावे – पो . नि . बाबासाहेब बोरसे
वाहतुक पोलीसांशी वाद घालणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल
प्रतिनिधी : संजय वायकर
अहिल्यानगर : दि . ०७/०२/२०२५ रोजी दुपारी १२.५० वाजता शहर वाहतुक शाखेचे पोहेकॉ संजय बाजीराव दळवी हे डी.एस.पी. चौक येथे वाहतुक नियमन करत असतांना मोटार सायकल क्रमांक एम.एच.१६ डी.डी. ७४०५ चे मालक / चालक हे सिंग्नल तोडुन जात असतांना पोहेकॉ. दळवी यांनी त्यांचे मोटार सायकलवर ऑनलाईन ई-चलन दंडाची कारवाई केली ऑनलाईन दंडाचा मेसेज मालक / चालक यांना आल्यावर ते वाहन चालक परत डी.एस.पी. चौक येथे येवुन पोहेकों. दहवी यांच्या सोबत वाद घालुन सरकारी कामात अडथळा केला त्यामुळे संजय सर्जेराव म्हस्के वय ५५ वर्षे रा. टाकळी काझी ता.जि.अहिल्यानगर यांचेवर भा.न्या. सहिंता २२१ कलमान्वये रितसर तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असुन त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई केली आहे.
शहर वाहतुक शाखा, अहिल्यानगर चे प्रमुख पो.नि. बाबासाहेब बोरसे यांनी जनतेस अवाहन केले आहे की, सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावे, वाहतुक पोलीस आपले सुरक्षेसाठी असून त्यांना सहकार्य करावे त्यांच्याशी वाद घालू नये. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या चालकांविरुध्द नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल असे वाहतूक पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी सांगितले .