समाजकार्यासाठी डॉ. उद्धव शिंदे यांचा “अहिल्यानगर आयकॉन” पुरस्काराने गौरव
अभिनेत्री स्मिता गोंदकर यांच्या हस्ते स्वीकारला पुरस्कार

समाजकार्यासाठी डॉ. उद्धव शिंदे यांचा “अहिल्यानगर आयकॉन” पुरस्काराने गौरव
अभिनेत्री स्मिता गोंदकर यांच्या हस्ते स्वीकारला पुरस्कार
प्रतिनिधी : संवेद वायकर
अहिल्यानगर – समाजातील वंचित, गरजू आणि उपेक्षित घटकांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या स्नेहबंध सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव यशवंत शिंदे यांना प्रतिष्ठेचा “अहिल्यानगर आयकॉन अवॉर्ड” २०२५ प्रदान करण्यात आला.
सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता गोंदकर यांच्या हस्ते अहिल्यानगर येथील नंदनवन हॉलमध्ये हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी १०६.४ एफ एम रेडिओ ऑरेंज रिजनल बीजनेस हेड संजय आंबुले, प्रोग्रामिंग हेड यशवंत कुलकर्णी उपस्थित होते.
२०१२ साली घेतलेल्या एका छोट्याशा सामाजिक उपक्रमातून सुरु झालेला स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेला डॉ. उद्धव शिंदे यांचा हा
प्रवास आज प्रेरणादायी ठरला आहे.
डॉ. शिंदे यांनी गेल्या १२ वर्षात अनेक सामाजिक उपक्रम राबवले. त्यात रक्तदान शिबीर, वैद्यकीय मदत, आरोग्य जनजागृती, शैक्षणिक सुविधा, अनाथ आणि दिव्यांगांना आधार, महिला सक्षमीकरण आणि युवक प्रेरणा, वृक्ष लागवड, मुलांसाठी निबंध, चित्रकला स्पर्धा, किल्ले बनवा स्पर्धा आदींचा समावेश आहे. डॉ. शिंदे यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
हा पुरस्कार जबाबदारीची जाणीव करून देणारा
समाजासाठी केलेले कार्य हेच माझे सर्वात मोठे समाधान आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. शिंदे यांनी दिली.



