नंदादीप माध्यमिक विद्यालयात इ. 10 वि च्या विद्यार्थ्यांना निरोप
नंदादीप माध्यमिक विद्यालयात इ. 10 वि च्या विद्यार्थ्यांना निरोप
प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर :- निबं ता. अमळनेर येथील नंदादीप माध्यमिक विद्यालय येथे इ. 10 वी च्या विद्यार्थ्यांचां निरोप समारंभ साजरा करण्यात आला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे चेअरमन आबासाहेब अँड. राजेन्द्र भगवान चौधरी होते. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून पेठ जि. नाशिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब वासुदेव देसले साहेब उपस्थित होते. वासुदेव देसले साहेब यांच्या हस्ते विद्यालयातील सि. सि. टि व्ही संचाचे व चेअरमन आबासाहेब अँड राजेन्द्र भगवान चौधरी यांच्या हस्ते विद्यालयातील एल. ई .डी.टि व्ही संचाचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमास वासुदेव देसले साहेब यांच्या पत्नी सौ. सुषमा देसले, सरकारी वकील प्रधान साहेब, किशोर बागुल, तसेच मोहन काटे, जिल्हा होमगार्ड अधिकारी गोपाल पाटील, आबासाहेब डॉ. एल. डी. चौधरी. नानासाहेब ज्ञानेश्वर ओकांर पाटील, आप्पासाहेब ईश्वर भगवान चौधरी ,पोलीस पाटील सौ. मिताली पाटील,गावातील नागरिक व पालक वर्गउपस्थित होते. कार्यक्रमात इ. 10वी च्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच वासुदेव देसले साहेब, डॉ. एल. डी. चौधरी, मुख्याध्यापक ए. बी. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुतार सर, विशेष अतिथी परिचय राहुल पाटील सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ए. जी. पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.