गुंडेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी नानासाहेब हराळ यांची बिनविरोध निवड..
गुंडेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी नानासाहेब हराळ यांची बिनविरोध निवड..
वाळकी / प्रतिनिधी : दादासाहेब आगळे
राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या गुंडेगाव ता. नगर येथील ग्रामपंचायतच्या उप- सरपंचपदी बाळासाहेब हराळ यांच्या गटाकडून श्री नानासाहेब हराळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माजी उपसरपंच सौ. कुसुमताई भाऊसाहेब हराळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने गुंडेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद रिक्त झाले होते. या रिक्त झालेल्या जागेवर बाळासाहेब हराळ यांच्या गटाकडून श्री नानासाहेब रंगनाथ यांनी उमेदवारी अर्ज भरला. एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने पिठासीन अधिकारी सौ मंगल ताई सकट यांनी उपसरपंच पदाच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा केली.
गुंडेगाव ग्रामपंचायत मध्ये बाळासाहेब हराळ गटाचे आठ तर विरोधी गटाचे चार सदस्य आहेत तर एका सदस्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याने ते रिक्त आहे. गुंडेगाव ग्रामपंचायतचे सरपंच पद हे मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव आहे.
यावेळी नूतन उपसरपंच श्री नानासाहेब हराळ यांनी येथून पुढील काळात श्री बाळासाहेब हराळ यांच्या नेतृत्वाखाली काम करताना गावच्या विकासात मोलाचा हातभार लावणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी सरपंच श्री संजय कोतकर यांनी येत्या सहा महिन्यात गावचा विकास सर्वांगीण पद्धतीने करणार असल्याचे सांगितले. गावातील प्रत्येक वार्डामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लांटची उभारणी, गावातील प्रत्येक स्ट्रीट लाईट पोलवरती स्ट्रीट लाईट बसवणे, गावातील स्मशानभूमीचा विकास करणे, गावांतर्गत कच्च्या रस्त्यांची दुरुस्ती व मुरमीकरण करणे, ग्रामपंचायतच्या कार्यालयाची उभारणी करणे, शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसा बारा तास सोलर प्लांट च्या माध्यमातून वीज पुरवठा करणे, घरगुती वीज ग्राहकांना 24 तास लाईटचा पुरवठा व्हावा यासाठी गावठाण फिडर योजना कार्यान्वित करणे, मंगल कार्यालय अद्ययावत करण्यासाठी सुविधा निर्माण करणे, पिण्याच्या पाण्यासाठी टाक्यांची उभारणी करणे, दलित वस्ती योजनेअंतर्गत हराळ मळा, कासार मळा व मांडवगण रोडवर स्ट्रीट लाईट योजना राबवणे, महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करणे, वनविभागा अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रावर पाणलोट विकासाची कामे करणे, गावातील सर्व प्राथमिक शाळांना इंटर ऍक्टिव्ह बोर्ड सुविधा उपलब्ध करून देणे, अंगणवाड्यांचे सुशोभीकरण करणे व दुरुस्त करणे,नवीन ग्रामपंचायत कार्यालय उभारणे, महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करणे, गावांतर्गत सुशोभीकरण करणे, अशी अनेक कामे येत्या दोन महिन्यात मार्गी लावणार असल्याचे सांगितले.
उपसरपंच निवडीच्या सभेसाठी ग्रामपंचायत सदस्य श्री संजय कोतकर,श्री सुनील भापकर, सौ कुसुमताई भाऊसाहेब हराळ, जयश्री नवनाथ कुताळ,सुरेखा रमेश चौधरी,छाया नंदराम माने,संतोष धावडे, राहुल चौधरी उपस्थित होते. सभेचे कामकाज हे ग्रामविकास अधिकारी श्री होनकर्पे भाऊसाहेब यांनी पाहिले.
नूतन उपसरपंच श्री नानासाहेब हराळ यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला त्यावेळी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ, फर्टीलायझर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष श्री छबुराव हराळ, सेवा सोसायटीचे चेअरमन श्री रावसाहेब कोतकर, रामदास हराळ,पोपटराव भापकर, नानासाहेब हराळ, वामनराव जाधव, शिवनाथ कोतकर, धन्यकुमार हराळ, चंद्रकांत निकम, संदीप भापकर, भाऊसाहेब कोतकर, अशोक पवार,गणपतराव हराळ, बाळासाहेब चौधरी, दिलीप जाधव, भाऊसाहेब हराळ,अंकुश कुताळ, बाबासाहेब कोतकर, रमेश हराळ, पोपट तांबे, सर्जेराव माने, वसंतराव भापकर,रोहिदास कुताळ,नवनाथ कुताळ,अंबादास धावडे, बाबासाहेब धावडे, योगेश जवक,गोरख कोतकर, अनिल पवार, मनोहर हराळ इ. ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



