Breaking
ब्रेकिंग

सौ. सुंदरबाई माणिक आडसूळ पॉलिटेक्निक मधील ४१ विद्यार्थ्याची नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत वार्षिक २.४ लाख पॅकेज देऊन निवड

0 3 9 0 3 9

सौ. सुंदरबाई माणिक आडसूळ पॉलिटेक्निक मधील ४१ विद्यार्थ्याची नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत वार्षिक २.४ लाख पॅकेज देऊन निवड

एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क

चास, येथील सौ सुंदरबाई माणिक आडसूळ पॉलिटेक्निक हे दर्जेदार शिक्षण पद्धती व विविध सामाजिक व तांत्रिक उपक्रमात सतत अग्रेसर असलेले तंत्रनिकेतन आशी ओळख प्राप्त झालेले तंत्रनिकेतन आसून विद्यार्थांना तांत्रिक ज्ञानाबरोबर विविध औद्योगिक तंत्रकौशल्य प्रात्यक्षिकांसह भरपूर सराव व क्षेत्रभेटी ई .माध्यमातून परिपूर्ण अभियंते निर्माण होत असल्याकारणाने आडसूळ तंत्रनिकेतनमधील अंतिम वर्षात शिकत असलेल्या व अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या ७० विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंट साठी सहभाग नोंदवला , त्यापैकी ४१ मुलांची यशस्वीरीत्या निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांकरिता कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन दि. २५ मार्च २०२५ रोजी करण्यात आले होते. कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये मेकॅनिकल , इलेक्ट्रीकल आणि ई . अँड. टी . सी. विभागातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना मुलाखतीनंतर नियुक्तीपत्र देण्यात आले व उरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा संपल्यानंतर कंपनीमध्ये बोलवण्यात आलेले आहे. सदर प्लेसमेंट मध्ये एस. पी. एम. ऑटोकॉम्प सिस्टिम्स प्रायव्हेट. लि., रांजणगाव यथील कंपनीने सहभाग घेतला होता. प्रसंगी तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. रमेश गडाख यांनी आमचे विद्यार्थी केवळ परीक्षार्थी नसून तांत्रिक व औद्योगिक शेत्रात लागणाऱ्या कौशल्याने परिपूर्ण असल्यामुळेच निवडीस पात्र ठरलेले आहेत असे प्रतिपादन केले.

प्रसंगी एस. पी .एम . ऑटोकॉम्प सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड चे एच. आर. प्रमुख श्री. अमोल कदम यांनी मुलाखतीसाठी कोणकोणत्या कौशल्याची गरज असावी लागते, कंपनीमध्ये कसे काम करावे, स्मार्ट गोल कसा सेट करावा, चुका मधून कसे शिकावे आणि कमीत कमी चार ते पाच वर्ष पहिल्या कंपनीचा अनुभव घेऊन नंतरच नवीन कंपनीमध्ये जण्याचा विचार करावा असे सांगितले. श्री.सचिन सोनटक्के प्रोडक्शन प्रमुख यांनी कंपनीविषयी सखोल माहिती देऊन विद्यार्थ्यांकडून कंपनीच्या अपेक्षित कौशल्य व ज्ञानाबद्दल माहिती दिली .

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अनिरुद्ध माणिक आडसूळ, सेक्रेटरी मा. लीनाताई आडसूळ, खजिनदार मा. श्री परमेश्वर आडसूळ, संचालक मा.कृष्णा आडसूळ, प्राचार्य व डायरेक्टर डॉ. प्रदीप एम. पाटील, आडसुळ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. संभाजी पठारे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. धनंजय लांडगे व डॉ. संदेश वायाळ आणि तंत्रनिकेतनचे प्राचार्य मा.रमेश गडाख, प्रशिक्षण व रोजगार आधिकरी प्रा. पवळे एस. एस. , ई. अँड टि. सी. विभाग प्रमुख प्रा.पाळंदे एस . सी., संगणक विभाग प्रमुख प्रा. होले पी .पी. , सिव्हिल विभाग प्रमुख प्रा.म्हस्के ए . ए., मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. जाधव एम.बी. , यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दरदले जे .पी. यांनी केले व सर्व उपस्थित मान्यवरांचे प्रा. जाधव एम .बी.यांनी आभार मानले.

1/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे